राष्ट्रीय रोबोटिक्स स्पर्धेत रोबो रेस आणि रोबो सॉकर स्पर्धेत संत गाडगे बाबा अभियांत्रिकी महाविद्यालयाने पटकावला प्रथम क्रमांक :


भुसावळ – येथील श्री संत गाडगे बाबा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ब्लँका बोट्झ या संघाने तेलंगणा राज्यातील हैदराबाद येथील श्रीनिधी इंस्टीट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी ह्या ठिकाणी आयोजित राष्ट्रीय रोबोटिक्स स्पर्धेत रोबो रेस आणि रोबो सॉकर ह्या दोन स्पर्धा प्रकारांमध्ये प्रथम क्रमांक पटकाविला.
पुस्तकी ज्ञानाबरोबरच उद्योगांना अपेक्षित उपयोजित ज्ञान देण्याचा आमचा प्रयत्न असतो आणि त्याच माध्यमातून काम करण्यासाठी महाविद्यालयात आम्ही मल्टी डिसीप्लिनरी सेल स्थापन केलेला आहे. पारंपरिक ज्ञांनाबरोबरीनेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत भविष्यावेधी रचना करण्यासाठी ह्या सेल द्वारे आम्ही प्रयत्न करत असतो आणि नव नवीन संवरचना सादर करत असतो त्याच प्रयत्नातून साकारलेल्या रोबोट्सचा विजय हा अभिमानास्पद असल्याचे प्रतिपादन ह्या प्रसंगी प्राचार्य डॉ. राहुल बारजिभे यांनी केले.
आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेल्या ब्लँका बोट्झ ह्या श्री संत गाडगे बाबा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या आंतर्राष्ट्रीय स्तरावरच्या संघाकडून भाग घेतांना अपेक्षांचे खूप मोठे ओझे होते पण त्या अपेक्षा सार्थ ठरवल्याचा आनंद काही औरच असल्याचे धिरज बेहरानी याने सागीतले. धिरज बेहरानी व्यतिरिक्त ह्या संघात सौरभ नितिन चौधरी, अमित तिवारी, नायर गौतमकृष्ण अरुण, अभय नरेंद्र महिरे आणि निशांत किशोर भंगाळे यांचा समावेश होता. अक्षय जोशी आणि विरेन्द्र खंडागळे यांनी मार्गदर्शकाची मार्गदर्शकाची भूमिका बजावली.
तांत्रिक ज्ञान, संघ समन्वय आणि सराव ह्या संतुलित त्रीसूत्रीतून हा विजय साकारल्याचे ब्लँका बोट्झ समन्वयक डॉ. गिरीश कुलकर्णी यांनी सांगितले.
हिन्दी सेवा मंडळाच्या सचिव श्रीमती एम.डी.शर्मा, कार्याध्यक्ष सत्यनारायण गोडयाले कोशाध्यक्ष एम.डी.तिवारी, रमेश नागराणी, संजय नाहटा, पंकज संड विभागप्रमुख डॉ. गिरीश कुलकर्णी, प्रा.अविनाश पाटील, डॉ. एस.बी. ओझा, डॉ.पंकज भंगाळे, प्रा.ए.पी.चौधरी, डॉ.डी.डी.पाटील यांनी ह्या उपक्रमाचे कौतुक केले.