भुसावळ – भुसावळ रोटरी क्लबने सन 2020-2021 मध्ये उत्कृष्ट कामे केल्याची दखल रोटरी डिस्ट्रीक्ट गव्हर्नर शब्बीर शाकीर यांनी घेतली असून पाच अॅवॉर्ड भुसावळ क्लबला जाहीर केले आहेत. विशेष म्हणजे भुसावळ रोटरी क्लब अध्यक्ष गजानन ठाकूर(जी आर मामा ) यांचा ‘आऊट स्टॅण्डींग प्रेसीडेंट’ (प्लॅटीनम) अॅवॉर्डने नागपूर येथे झालेल्या कार्यक्रमात सन्मानीत करण्यात आले.
नागपूर शहरातील हॉटेल सेंटर पॉईंट येथे झालेल्या कार्यक्रमात रोटरी क्लबचे अध्यक्ष गजानन ठाकूर यांना ‘आऊट स्टॅण्डींग प्रेसीडेंट प्लॅटीनम अॅवॉर्ड’ने सन्मानीत करण्यात आले. यावेळी भुसावळ रोटरी क्लबला मेंबरशीप डेव्हलपमेंटसाठी आर.एन.भाटीया मेमोरीयल ट्रॉफी तसेच ‘उत्कृष्ट बुलेटीन’साठी अॅवॉर्ड देण्यात आला तसेच रोटेरीयन पास्ट प्रेसिडेंट डॉ.रवींद्र शुक्ला यांना ‘विशेष कौतुक पुरस्कार’ देण्यात आला तसेच पास्ट प्रेसिडेंट राजीव सैगल यांचाही विशेष कौतुक पुरस्काराने सन्मान करण्यात आला. दरम्यान, 2020-2021 उत्कृष्ट कार्याबद्दल रोटरी क्लब ऑफ भुसावळला ‘इंटरनॅशनल रोटरीचे सायटेशन’ने सन्मानीत करण्यात आले आहे.
नागपूर येथील कार्यक्रमास पीडीजी शब्बीर शाकीर, जुमानाजी शाकीर, पीडीजी संग्रामसिंग भोसले, किशोर केडीया, महेश मोकालकर, राजीव शर्मा (भुसावळ), इनकमिंग गर्व्हनर वेणूगोपाल, खुराणा, पास्ट प्रेसिडेंट गजानन ठाकूर (भुसावळ), राजीव सैगल (भुसावळ) आदींची उपस्थिती होती.



