भुसावळ – येथील आयुध निर्माणी भुसावळ येथे स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृतमहोत्सव अनुषंगाने दिनांक 14 डिसेंबर 2021 रोजी सकाळी दहा वाजता भव्य उत्पादन प्रदर्शनीचे विधीवत उद्घाटन निर्माणी चे महाप्रबंधक श्री वसंत निमजे यांनी केले
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रॉडक्ट पत्रिकेचे विधिवत प्रकाशन करण्यात आले महाप्रबंधक यांनी संबोधन पर भाषणात स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव ही आपल्यासाठी गौरवपूर्ण गोष्ट आहे माननीय रक्षा मंत्री श्री राजनाथ सिंह यांनी ऑनलाइन माध्यमाने संपूर्ण भारतात सुरू असलेल्या प्रदर्शनीचे उद्घाटन केले
याप्रसंगी निर्माणीच्या विविध उत्पादनाची माहिती महाप्रबंधक यांनी सर्वांना दिली व नवीन उत्पादन व फॉरेनच्या ऑर्डर बाबत सांगितले त्यांनी विश्वास दिला की निर्माणीचे भविष्य उज्ज्वल राहणार आहे त्यानंतर दीप प्रज्वलन व रिबीन कापून विधिवत उत्पादन प्रदर्शनी सर्वांसाठी खुली करण्यात आली

या प्रदर्शनीच्या वेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सांगितले की इंडिया लिमिटेड मधील आयुध निर्माणी भुसावळ ही वसंत निमजे महाप्रबंधक यांच्या नेतृत्वाखाली संरक्षण क्षेत्रात मोलाची कामगिरी बजावत आहे ही फार मोठी गौरवपूर्ण गोष्ट आहे.तसेच प्रदर्शनीचे वैशिष्ट्य म्हणजे मुख्य ठिकाणी सेल्फी पॉइंट व्हिडिओ फिल्म प्रदर्शन लावण्यात आलेले आहे
सदर प्रदर्शनीला अभिजीत राऊत जिल्हाधिकारी , कर्नल आय एस चेगप्पा एडम कमांडर,कैप्टन एच एस कपूर आर्टिलरी, सचिन श्रीवास्तव डेप्युटी सी एम एम रेल्वे तसेच श्रीमती वैजयंती निमजे अध्यक्षा दीपशिखा महिला कल्याण समिति यांची विशेष उपस्थिति होती.
जेसीएम 3 जेसीएम फोर्थ सदस्य कार्य समिती सदस्य
सर्व यूनियन असोसिएशनचे पदाधिकारी व अधिकारी वर्ग उपस्थित होता.सदर प्रदर्शनी ही कम्युनिटी हॉल निर्माणी इस्टेट भुसावळ येथे आयोजित केलेली आहे
प्रदर्शनी साठी प्रवेश हा सर्वांसाठी निशुल्क आहे स्वातंत्र्यप्राप्ती ला 75 वर्षे पूर्ण होत आहेत त्या निमित्ताने भारत सरकारने अमृतमहोत्सव साजरा करण्याचे आयोजित केले आहे.-
तरी सर्व नागरिकांना विशेष करून शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त संख्येने या उत्पादन प्रदर्शनीचा लाभ दिनांक 15 डिसेंबर रोजी सुुद्धा लाभ घ्यावा असे आवाहन वसंत निमजे महाप्रबंधक यांनी याप्रसंगी केले अशी माहिती निर्माणी भुसावळचे पीआरओ बी देवीचंद डीजीएम यांनी दिली.


