वरणगाव – शहर शिवसेनतर्फे उद्या दि.15 बुधवार सायंकाळी 4 वाजता प्रतिभा नगर येथे शिवसेना बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
या बैठकीला मुंबई शिवसेना भवन येथून नवीन नियुक्ती झालेले नवनिर्वाचित भुसावळ विधानसभा संपर्क प्रमुख सुरेशजी राणे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. वरणगाव शहरातील पदाधिकारी कार्यकर्ते शिवसैनिक यांच्याशी ओळख परिचय आणि आगामी वरणगाव नगरपालिका निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी शिवसैनिकांशी चर्चा करणार आहे. या बैठकीला शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन सर, जिल्हा संघटक विलास मुळे उपस्थित राहणार आहे.
तरी वरणगाव शहरातील शिवसैनिकांनी सायंकाळी 4 वाजता प्रतिभा नगर येथे उपस्थित रहावे असे आवाहन उपतालुका प्रमुख वरणगाव शहर सुभाष चौधरी यांनी केले आहे .



