भुसावळ : भुसावळ पालिकेच्या उपनगराध्यक्षपदी ठरल्याप्रमाणे सोमवारी भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक राजेंद्र नाटकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. पालिकेच्या विशेष सभेच्या पीठासीन अधिकारीपदी तहसीलदार दीपक धीवरे होते. नाटकर यांच्या बिनविरोध निवडीनंतर नगराध्यक्ष रमण भोळेंसह नगरसेवक, पदाधिकार्यांनी त्यांचा सत्कार केला. केवळ 14 दिवस नाटकर यांना संधी मिळणार आहे. दरम्यान, अखेरच्या वर्षात पाच जणांना संधी देण्याचे नियोजन असलेतरी प्रत्यक्षात चौघांनाच संधी मिळाली.
प्रभारी नगराध्यक्षा तथा उपनगराध्यक्षा सोनी संतोष बारसे यांनी 6 डिसेंबर रोजी राजीनामा दिल्यान8ंतर रीक्त पदासाठी सोमवारी निवडणूक झाली. तहसीलदार दीपक धिवरे अध्यक्षतेस्थानी होते. नगराध्यक्षपदासाठी राजेंद्र नाटकर यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडीनंतर तहसीलदार दीपक धीवरे, नगराध्यक्ष रमण भोळे, मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांनी नाटकर यांचे स्वागत केले. यावेळी माजी प्रभारी नगराध्यक्ष युवराज लोणारी, प्रमोद नेमाडे, माजी नगरसेवक राजेंद्र आवटे, स्विकृत नगरसेवक मनोज बियाणी, प्रा.सुनील नेवे, माजी उपनगराध्यक्षा लक्ष्मी मकासरे, अमोल इंगळे, निर्मल कोठारी, किरण कोलते, प्रा. दिनेश राठी, दिनेश नेमाडे, परीक्षीत बर्हाटे, शोभा नेमाडे, गिरीष महाजन, देवेंद्र वाणी आदींसह नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.



