भुसावळ – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागा तर्फे संतोष चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली देशाचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच अल्पसंख्याक दिनाचे औचित्य साधून मा. पवार विचार सर्वसामान्य कार्यकर्त्या पर्यंत आणि जनता जनार्दना पर्यंत पोहोचवण्याच्या हेतूने अल्पसंख्याक कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन दिनांक 15 डिसेंबर 2021 बुधवार संध्याकाळी 6 वाजता
नवी ईदगाह समोर हिरा हॉल,भुसावळ येथे
करण्यात आले आहे .
कार्यक्रमाचे अध्यक्ष भुसावळ नगरीचे शिल्पकार संतोष चौधरी प्रमुख उपस्थिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्यासाहेब पाटील, पालकमंत्री गुलाबराव देवकर, आमदार मनीष दादा जैन, युवा नेत्या रोहिणी ताई खडसे ,एजाज मलिक,अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष मजहर पठाण आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे .
तरी सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व सेलचे पदाधिकारी, नगरसेवक जि.प सदस्य पं.स सदस्य ग्रामपंचायत सदस्य आणि सर्वं राष्ट्रवादी प्रेमी नागरिकांनी कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन मजहर पठाण
अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, जळगाव जिल्हा , पप्पू जकातदार
अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष,राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भुसावळ तालुका, शोएब खान
अल्पसंख्याक शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भुसावळ शहर , शाकीर पिंजारी
जिल्हा उपाध्यक्ष अल्पसंख्यांक
नजर शेख, नाजीम भाई कादरी यांनी केले आहे .



