लग्नामध्ये व-हाडयांना अक्षदा सोबत मास्क : भुसावळातील सुपे परिवाराचा स्तुत्य उपक्रम :


भुसावळ – येथील मोरया मंगल कार्यालयात सोमवारी झालेल्या लग्नसमारंभात वर्हाडीना अक्षदा सोबत मास्क वाटप करण्यात आले.
याबाबत वृत्त असे की ओमायक्रोन व कोरोना ची लाट वाढत असल्याने लग्नसमारंभात गर्दी होऊन याचा फैलाव होऊ नये म्हणून लग्नामध्ये आलेल्या सर्व मंडळींना अक्षदा यांसोबत मास्क देण्यात आले.
भुसावळातील विजय मधुकर सुपे याचे मुलीचे लग्नं मोरया हाॅल,भुसावळ येथे दि.१३ रोजी संपन्न झाले,लग्नात आलेल्या पाहुण्यांचे स्वागत मास्क देऊन करण्यांत आले. अशा या आगळ्या वेगळ्या स्वागताची शहरभर चर्चा होती.