जळगाव : शहरातील दादावाडी परीसरातील एकविरा हॉटेल जवळून दुचाकी चोरणार्या संशयीत आरोपीला तालुका पोलिसंनी अटक केली. या प्रकरणी तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत माहिती अशी की, शहरातील दादावाडी परिसरात गुरूवारी 9 डिसेंबर रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास दोन जण दुचाकीवर संशयास्पद हालचाली करत असल्याची गोपनिय माहिती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचार्यांना मिळाली. सोहेल युसूफ अली (19, रा.रजा टॉवर, जाम मोहल्ला, इराणी गल्ली, भुसावळ) असे अटकेतील संशयीताचे नाव आहे. दरम्यान, संशयीतासोबतचा अन्य एक दुचाकीसह पसार झाला आहे.



