जळगाव – सकारात्मक विचारानेचं माणसाची प्रगती होते.असे प्रतिपादन .डॉ.प्रविणकुमार मुंढे (पोलीस अधिक्षक )जळगाव यांच्या संकल्पनेतून “नवचैतन्य कोर्स पोलीस मंगलम हॅाल जळगाव येथे केले.विचार मंचावर मा.डेरे (होम डी वाय एस पी )होते.
कोरोनाच्या महामारीत पोलीस कर्मचारी ,अधिकारी यांनी जीवाची पर्वा न करता काम केलं.त्या मध्ये अनेक बांधव “शहीद “झाले.आज आपण जीवंत आहोत,हे आपल्याला “बोनस “मिळालेलं आयुष्य आहे.ते समाजाच्या भल्यासाठी वेचू या.त्याच बरोबर आपल्या आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे आहे.ताणतनाव विरहीत जगणे हेच आरोग्याचे लक्षण आहे.जर आपण राग विकत घेतला तर एॅसिडीटी फुकट मिळते.आपण द्वेष विकत घेतला तर अल्सर फुकट मिळतो .ताणतनाव विकत घेतला तर बी पी शुगर फुकट मिळते.अन जर शांती विकत घेतली तर “समरूद्धी फुकट मिळते.आता आपण ठरवायचं काय घ्यायचं काय सोडायचं.संचलन वाघ यांनी तर आ रविंद्र तायडे यांनी मानले.



