शहरातील सामाजिक कार्यकर्ते प्रमोद वामन सावकारे यांच्या नावाने फेक फेसबुक खात्यावरुन पैशांची मागणी –


भुसावळ – शहरातील सामाजिक कार्यकर्ते प्रमोद वामन सावकारे यांच्या नावाने भामट्याने फेक फेसबुक खाते काढत त्यावरून शहरातील अनेकांना पैशांची मागणी केल्याचा प्रकार शुक्रवार, 10 रोजी उघड झाल्याने शहरात खळबळ उडाली. याबाबची माहिती अनेकांनी स्वतः प्रमोद सावकारे यांच्या लक्षात आणून दिली. दरम्यान, आपल्या नावाने भामट्याने फेक खाते उघडले असून कुणीही संबंधिताच्या खात्यावर रक्कम पाठवू नये, असे आवाहन प्रमोद सावकारे यांनी केले आहे. या संदर्भात पोलिसात तक्रार दाखल करणार असल्याचे सावकारे म्हणाले.