भुसावळात कोविड लसीकरण अंतर्गत दिनांक 9 ते 11 डिसेंबर पर्यंत मेगा शिबिर – मुख्याधिकारी संदीप चिंद्रवार :

भुसावळ – शहरांमध्ये कोव्हीड लसीकरण अंतर्गत दिनांक 9 डिसेंबर पासून ते 11 डिसेंबर पर्यंत मेगा शिबिराचे नियोजन करण्यात आलेले आहे यामध्ये भुसावळ शहरांमध्ये
ठीक ठिकाणी सकाळी नऊ वाजेपासून रात्री सात वाजेपर्यंत कोव्हिडं लसीकरणाचे शिबिराचे नियोजन करण्यात आलेले आहे. तरी भुसावळ मधील सर्व नागरिकां तिसऱ्या लाटे पासून संरक्षण करण्याच्या दृष्टिकोनातून सर्व नागरिकांनी आपले लसीकरण पूर्ण करून कोव्हिडं या आजारापासून संरक्षण करावे असे आवाहन मुख्याधिकारी संदीप चिंद्रावार यांच्यामार्फत करण्यात आले आहे .

यामध्ये भुसावळ शहरांमध्ये काही भागांमध्ये बूथ चे नियोजन करण्यात आलेले असून ,काही टीम या गृहभेटी दारे कोव्हिडं चे लसीकरण करतील तसेच काही टीम या ट्रांझिट टीम प्रमाणे महत्त्वाच्या चौकांमध्ये कोव्हिडं चे लसीकरण करतील.
या अंतर्गत एकूण 28 टीम नियुक्त करण्यात आलेले असून
— ट्रान्झिट टीम चार
—-बूथ बारा
—-गृहभेटी द्वारे तीन दिवसांमध्ये एकूण 45 टीम
यांच्या मार्फत लसीकरण करण्यात येईल .

वरील सर्व टीम व्यतिरिक्त नगरपालिका संचलित
–मुख्य दवाखाना आयुर्वेदिक दवाखाना
—वरणगाव रोड शिवदत्त नगर दवाखाना
—–खडका रोड मनियार हॉल समोर दवाखाना
—-बद्री प्लॉट दवाखाना
—महात्मा फुले नगर दवाखाना
यासर्व दवाखान्यांमध्ये कोव्हिडं चे लसीकरण सत्र नियमित स्वरूपात सुरू राहणार आहे
तरी सर्व नागरिकांनी लाभ घेऊन कोव्हिडं चे लसीकरण पूर्ण करून घ्यावे.