भुसावळ – सामुहिक विवाह करून भोर गाव लेवा पंचायत पाडळसे शाखा भुसावळने एक नविन सामाजिक पर्व सुरू केले.या उपक्रमातंर्गत गुरुवारी भोरगाव लेवा पंचायत पाडळसे शाखा भुसावळ तर्फ 15 जोडप्यांचे वैदिक पध्दतीने सामुहीक विवाहा प्रसंगी लग्न लावून एक नविन उपक्रम सुरू केला.
सर्व प्रथम कौन्सिलींग चेअरमन आरती चौधरी यांनी वधुवरांस संसार सुरळीत होण्यासाठी मार्गदर्शन केले, कौन्सिलींग केले. गुरुवारी 12 वाजून 12 मिनिटांनी हा विवाहसोहळा संतोषीमाता हॉल मध्ये संपन्न झाला.
शासनाचे करोनाचे सर्व नियमा काटेकोर पालन करून मास्क सॅनीटाईझर,वापरून हा सोहळा संपन्न झाला.
सामाजिक समस्या,खर्चिक लग्न पध्दतीला आळा बसावा तसेच अन्नाची नासाडी,नाचणे,मुहूर्तावर लग्न न लावणे,कर्ज करून लग्न करणे याला आळा बसावा, समाजा पुढे एक आदर्श रहावा म्हणून उपक्रम करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी भातृमंडळ पुणे,भंगाळे गोल्ड, निलिमा जंगले,ज्ञानेश इंगळे अकोला,यांनी सहकार्य केले. पुरोहित राहुल जोशी गुरुजी यांनी वैदीक पध्दतीने विवाह विधी केला.
कुटुंब नायक रमेश पाटील
भोरगाव लेवा पंचायत भुसावळचे संचालक अध्यक्ष प्रकाश पाटील,सचिव डाॅ बाळू पाटील, स्वागताध्यक्ष सुहास चौधरी, उपक्रम चेअरमन आरती चौधरी, महेश फालक,शरद फेगडे, डिगंबर महाजन,परीक्षित ब-हाटे, आर.जी.चौधरी,मंगला पाटील, जयश्री चौधरी,
जळगाव, अकोला, फैजपूर सावदा. पाडळसे
व भुसावळचे बी.के चौधरी, भागवत भंगाळे,यादवराव ब-हाटे, सुरेखा भंगाळे,रोहीणी खडसे – खेवलकर,शालीनी पाटील, अशोक चौधरी,भाऊ साहेब फिरके,डॉ. दिप्ती चौधरी आर.एम.पाटील,रो. अध्यक्ष राजेंद्र फेगडे,अर्चना फेगडे,गजानन ठाकूर, विनित पाटील,नेहल लाढे,दिपक चौधरी प्रमोद धनगर,नीलेश भोळे, उल्हास महाजन,मनोज जावळे, संजय महाजन,
जोस्ना ब-हाटे,गीता चौधरी,नीला चौधरी,सीमा गाजरे,प्राची राणे, वैशाली भगत,उज्ज्वला महाजन, सुनंदा चौधरी,अर्चना चौधरी, केपीसी क्लब सहकारी यांनी सहकार्य करून उपस्थिती दिली.ही प्रतिष्ठीत मंडळी उपस्थित होती. या स्तुत्य नविन पर्वात उचलेल्या पाउलामुळे समाजाचे 45 लाख रुपयांची बचत झाल्याचे संचालकांनी कळविले.



