चंपाषष्ठीनिमित्त सावद्यात उद्या खंडेराव महाराज यात्रोत्सव –

सावदा : सुमारे तीनशे वर्षांची परंपरा असलेला व दरवर्षी सालाबादप्रमाणे मार्गशीर्ष महिन्याच्या चंपाषष्ठीला गुरुवारी होणारा यात्रोत्सव यंदादेखील कोरोनाचे शासकीय नियम पाळून साजरा करण्यात येणार आहे. स्थानिक व परीसरातील भक्तगणाचे श्रद्धास्थान असलेल्या आठवडे बाजारातील जागृत देवस्थान खंडेराव महाराज मंदिर असून परीसरात दरवर्षी मार्गशीर्ष महिन्याच्या चंपाषष्ठीला यात्रोत्सव होतो. यावर्षी मंदिर खुली करण्यात आली असली तरी कोरोनाच्या नवीन शासकीय आरोग्य विभागाच्या सूचना व नियमांचे पालन करून यात्रोत्सव गुरुवार, 9 डिसेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजता साजरा होत आहे.

विविध धार्मिक कार्यक्रम होणार
यात्रोत्सवात बारागाडे ओढण्याची परंपरा असून दरवर्षी बारागाडे ओढण्याचा मान पवार कुटुंबातील सहाव्या पिढीला मिळाला आहे. परंपरेनुसार सुपडू पवार, वसंत पवार, अशोक पवार तर यावर्षी राहुल (भगत) अशोक पवार हे बारागाड्या ओढतील. परंपरेनुसार मंदिरात सकाळी आरती, तळी भरणे, पूजा, अभिषेक होईल. अशोक वसंत पवार व राहुल अशोक पवार हे मंदिराची धुरा सांभाळत आहेत.