भुसावळात प्रभाग 10 मध्ये आयुष्यमान आरोग्य कार्ड योजनेचा शुभारंभ :शिवसेना शहराध्यक्ष बबलू ब-हाटे यांचा उपक्रम –


भुसावळ – शहरातील प्रभाग क्रमांक10 मधील विठ्ठल

मंदिर वॉर्ड येथे आयुष्यमान भारत योजनेच्या डिजिटल कार्ड नोंदणीचे शुभारंभ विठ्ठल मंदिर परिसरात शिवसेनेचे शहरप्रमुख बबलू बऱ्हाटे यांनी केला आहे

. या योजनेंतर्गत प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळतात. या योजनेअंतर्गत रुग्णालयात दाखल होण्याच्या 3 दिवस आधी आणि उपचारानंतर 15 दिवसांनी आरोग्य उपचार आणि औषधे मोफत उपलब्ध आहेत. कुटुंब कितीही मोठे किंवा लहान असले तरी या योजनेचा लाभ तितकाच दिला जातो. या योजनेअंतर्गत आधीपासून अस्तित्वात असलेल्या विविध वैद्यकीय परिस्थिती आणि गंभीर रोगांना पहिल्या दिवसापासून संरक्षण देण्यात आले म्हणून नागरिकांना याचा लाभ व्हावा यासाठी हे कार्ड काढून देण्यात येत आहे
तसेच प्रभाग क्रमांक10 नागरिकांसाठी प्रधानमंत्रीआयुषमान भारत योजना अभियान 2 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 10 वाजेपासून ते दुपारी 4 वाजेपर्यंत विठ्ठल मंदिर, येथे आयोजित करण्यात आले आहे. नागरिकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा
असे आवाहन शहरप्रमुख बबलू बऱ्हाटे यांनी केले आहे