भुसावळ – तालुक्यातील ग्रामपंचायत दर्यापूर मध्ये मा.सरपंच यांनी सन २००५ मध्ये आपल्या पदाचा फायदा घेऊन लाखो रुपयांचा भष्ट्राचार केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते संजय खन्ना यांनी पंचायत समिती भुसावळ येथे केली असून पंचायत समितीचे गट विकास अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले आहे.,

अधिक माहिती अशी की, सन २००५ मध्ये मा.सरपंच यांनी आपल्या पदाचा फायदा घेऊन लाखो रुपयांचा भष्ट्राचार ग्रामंपचायत दर्यापुरमध्ये केल्याचा आरोप संजय खन्ना सामाजिक कार्यकर्ता साईबाबा नगर दर्यापुर शिवार यांनी केला असून याबाबतची तक्रार मा.जिल्ह्याधिकारी जळगांव यांना पाठविण्यात आली असून या प्रकरणाची ईडी चौकशीसाठी मागणी केली आहे.
सदर तक्रार संजय खन्ना यांनी पंचायत समिती कार्यालय भुसावळ यांच्याकडे दि. ८/११/२०२१ रोजी दिली असून याची दखल गट विकास अधिकारी पंचायत समिती भुसावळ यांनी घेतली असून कागदपत्रांची चौकशी करून स्वयंस्पष्ट अहवाल दि. ६/१२/२०२१ पर्यंत सादर करण्याचे आदेश पारित करण्यात आले आहे.
या प्रकरणात मा जिल्ह्याधिकारी व वरिष्ठ अधिकारी काय पाउल उचलणार तसेच मा.सरपंच यांच्या विरुद्ध काय कारवाई करणार? याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.


