रेल्वे लोको पायलटला लुटणारा पसार आरोपी पोलिसांच्या जाळ्यात :


भुसावळ – येथील संभाजी नगर मधील रहिवाशी लोको पायलटची ड्युटी वरून आपल्या सायकल ने घरी जात असताना गार्ड लाईन रोड पाण्याच्या टाकीजवळ चार अनोळखी इसमानी संगणमत करुन रस्त्यात अडवून मारहाण करुन जखमी केल्याने पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सविस्तर वृत्त असे की,भुसावळ बाजार पेठ पो.स्टे.भाग 5 गुरन 402/2021 भादवी कलम 394,392,34 प्रमाणे दिनांक दि 20/09/2021रोजी 7:30 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्यातील फिर्यादी चंदन अनिरुद्ध प्रसाद वय 28 धंदा-सहा.लोको पायलट रा.संभाजी नगर भुसावळ हे दिनांक 20/09/2021रोजी रात्री 12.30 वा सुमारास हे ड्युटी वरून आपल्या सायकल ने घरी जात असताना गार्ड लाईन रोड पाण्याच्या टाकीजवळ चार अनोळखी इसमानी आपसात संगनमत करुन फिर्यादी यांना रस्त्यात अडवून मारहाण करुन जखमी केले व ताब्यातील एकुण कि.रु 53,500/-चे बॅग सोन्याची चैन मोबाईल व इतर मालमत्ता जबरीने हिसकावून चोरी करुन पळून गेले.सदर चा गुन्ह्या दाखल करण्यात आला असुन
सदर गुन्ह्यातील पाचवा संशयित पसार आरोपी मनिष उर्फ पप्प्या राजु साळवे वय 22 रा.15 बंगला भुसावळ याची पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांना मिळाल्या गुप्त बातमी वरुन त्यास आज रोजी भुसावळ शहरातून जाममोहल्ला भागातून सापळा रचून ताब्यात घेण्यात आले आहे.
सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक डाॅ प्रविण मुंढे .अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी , उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पो.निरीक्षक हरीष भोये, पो.ना. विकास सातदिवे, निलेश चौधरी,रमण सुरळकर उमाकांत पाटील, दिनेश कापडणे पो.काॅ ईश्वर भालेराव,प्रशांत सोनार ,योगेश माळी परेश बिर्हाडे ,जिवन कापडे अश्या नी केली आहे. सदर चा गुन्ह्या चा तपास सहा.पो.निरी.हरीष भोये पो.काॅ योगेश महाजन करत आहे.