पाळधी : कापूस व्यापार्यावर प्राणघातक हल्ला करीत त्याच्याकडील सुमारे दहा लाखांची रोकड लुटण्याच्या वादात कापूस व्यापार्याची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना पाळधीजवळ साईबाबा मंदिराजवळ शुक्रवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली. लुटारूंच्या हल्ल्यात स्वप्नील रत्नाकर शिंपी (35, फरकांडे, ता.एरंडोल) या कापूस व्यापार्याचा मृत्यू झाला तर सहकारी गुड्डू उर्फ राजेंद्र चौधरी (32, फरकांडे, ता.एरंडोल) हे जखमी झाल्याचे सांगण्यात आले.

पाळत ठेवून केला हल्ला
शिंपी व चौधरी हे कापूस व्यापारी असून जळगाव येथील कापूस विक्रीच्या व्यवहाराचे पैसे घेण्यासाठी दोघे जण चारचाकीने जळगावात शुक्रवारी होंडा सिटी कारने गेले होते. सुमारे 10 ते 15 लाखांची रोकड घेवून दोघे रात्री आठ वाजेच्या सुमारास ावाकडे निघाले असतानाच पाळधी जवळील साईबाबा मंदिराजवळ दुचाकीवरून आलेल्या चार ते पाच संशयीतांनी दुचाकीला धक्का लागल्याच्या कारणावरून वाद उकरून काढत शिंपी यांच्यावर अचानक प्राणघातक हल्ला चढवला व त्यांच्याकडील रोकड हिसकावण्याचा प्रयत्न केला मात्र शिंपी यांनी जोरदार प्रतिकार केल्याने लुटारूंनी त्यांच्यावर धारदार शस्त्राचे वार सुरू केले व त्याचवेळी पेट्रोल पंपावरील काही जण मदतीसाठी धावून आल्याचे पाहताच लुटारूंनी दुचाकीवरून पळ काढला.
जिल्ह्यात उडाली खळबळ
कापूस व्यापार्याची हत्या करण्यात आल्याच्या घटनेने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. कापूस व्यापार्यांकडे मोठ्या प्रमाणावर रक्कम असावी ? हा अंदाज बांधून लुटारूंनी प्लॅनिंग केले असल्याचा अंदाज आहे. चाळीसगाव विभागाचे अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांच्यासह पाळधी पोलीस ठाण्याच्या कर्मचार्यांनी घटनास्थही धाव घेतली.


