राष्ट्रीय ओबीसी मोर्चा तर्फे जेलभरो आंदोलन !

भुसावळ – शहरातील राष्ट्रीय ओबीसी मोर्चा व राष्ट्रीय किसान मोर्चा यांच्या वतीने संपूर्ण भारतभर श्रृंखला बध्द 5 टप्प्यामध्ये आंदोलन संपूर्ण भारतात 550 जिल्हे, 3500 तहसिल स्तरावर आयोजन केलेले असून 3 टप्याचे आंदोलन झाले असून 4 थ्या टप्यामध्ये दिनांक 25/11/2021 रोजी भुसावळ तहसिलदार कार्यालया समोर येऊन जेल भरो आंदोलन करण्यात आले.जेल भरो आंदोलन करण्यात आहे.

आंदोलनाच्या प्रमुख मागण्या : या ओबीसींची जाती निहाय जनगनणा करणे.

शेतकऱ्यांवर लादलेले काळे कायदे संसदेचे विशेष अधिवेशन बोलावून मागे घेण्यात यावे. इलेक्ट्रोनिक ओटींग मशीनवर मतदान प्रक्रिया बंद करुन मतदान मत पत्रिकेवर घेण्यात यावे.जेल भरो आंदोलनात सुधाकर रामकृष्णा बडगुजर, कल्पना अरुण मस्के,नंदा बाळकृष्ण सोनवणे,बाळकृष्ण शंकर सोनवणे,विजय सुखदेव सावळे,प्रमोद उंबरकर,पलक संघर्ष म्हस्के,संतोष लक्ष्मण ठोकळ,आशा प्रमोद तायडे,चंद्रभान जाधव,सुनील पाटील अशांनी सह्या व सामवेश होता.