भुसावळ : शहरातील तापी काठावरील हिंदू स्मशानभूमीचे सुशोभीकरण व नूतनीकरणाची कामे आमदार निधीतून अलीकडेच करण्यात आली. मंगळवारी आमदार संजय सावकारे यांच्याहस्ते या कामाचे लोकार्पण करण्यात आले. दरम्यान, विविध कामांमुळे स्मशानभूमीचा चेहरामोहरा बदलला असून नागरीकांमधून समाधान व्यक्त होत आहे. सुशोभिकरणात स्मशानभूमीच्या प्रवेशद्वारापासून ते अंत्यसंस्काराच्या ओट्यापर्यंतचे शेड, बसण्यासाठी आसन व्यवस्था, गंध मुक्ती हॉल, विसावा ओटा, वृक्षारोपण ही कामे करण्यात आली.

यावेळी नगराध्यक्ष रमण भोळे, प्रभारी नगराध्यक्षा सोनी बारसे, माजी प्रभारी नगराध्यक्ष युवराज लोणारी, माजी प्रभारी नगराध्यक्ष प्रमोद नेमाडे, मुख्याधिकारी संदीप चिद्रवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता पी.यू.ठाकूर, संतोष बारसे, भाजपचे शहराध्यक्ष परीक्षीत बर्हाटे, गिरीश महाजन, महेंद्रसिंग ठाकूर, राजेंद्र नाटकर, लक्ष्मण सोळंके, सतीश सपकाळे, अजय भोळे, विकास पाचपांडे, निकी बत्रा, प्रा.दिनेश राठी, अजय नागराणी, राजेंद्र आवटे, रमाशंकर दुबे, चतुर्भुज कन्स्ट्रक्शनचे योगेश पाटील, नगर अभियंता रवींद्र बाविस्कर, रीतेश बच्छाव, जीवन सरोदे, आशिष वाघोदे उपस्थित होते.


