भुसावळात पटेल कॉलनीत अवैध गॅस रिफिलिंगवर आय जी पथकाचा छापा ; 9 सिलेंडर, मशीनसह तीघे ताब्यात ;


भुसावळ – शहरातील पटेल कॉलनी भागात अवैध गॅस रिफिलिंग व्यवसाय अडड्यावर आइजी पथकाने आज गुरुवार 11 रोजी पुन्हा अचानक छापा घातला असता नऊ गॅस सिलेंडर व एक गॅस भरण्यासाठी वापरण्यात आलेली मशीनसह आरोपींना आय जी पथकाने छापा टाकून ताब्यात घेतले आहे.अचानक आय जी पथकाच्या छाप्यामुळे अवैधरित्या गॅस सिलेंडर भरुन व्यवसाय करणाऱ्यां मध्ये खळबळ उडाली आहे .
जळगांव जिल्ह्यात अवैधधंदे बोकाळले असल्याने काही दिवसांपूर्वी पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी सर्व पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना कारवाई करण्याचा सूचना दिल्या त्यानुसार जळगांव स्थनिक गुन्हे शाखा पथकाने कारवाईस सुरुवात केली आहे.
या अनुषंघाने पटेल कॉलनीत कित्येक वर्षांपासून गॅस रिफिलिंगचा अवैध व्यवसाय सुरू असल्याच्या सुगाव्या वरुन उपविभागीय पोलिस अधिकारी यांनी कारवाई आदेश दिले यावरून बाजारपेठ पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाने २३/०९/२०२१ रोजी या ठिकाणी कारवाई करीत चार गॅस सिलेंडर व एक रिफिलिंग मशीन आरोपिकडून हस्तगत केली होती.
परंतु आज रोजी पुन्हा पटेल कॉलनीत दिनांक ११/११/२०२१ रोजी भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन हद्दीत आय जी पथक दाखल झाले असून नऊ गॅस सिलेंडर व एक गॅस भरण्यासाठी वापरण्यात आलेली मशीन सह तीघा आरोपींना आय जी पथकाने छापा टाकून ताब्यात घेतले असून भुसावळ बाजारपेठ पोलिसात मुद्देमालासह आरोपी जमा करण्यात आले असून पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरा पर्यत सुरू आहे.