भुसावळ – केंद्र शासनाने, भगवान बिरसा मुंडा यांचा १५ नोव्हेंबर हा जन्मदिवस, जनजाति गौरव दिवस म्हणून साजरा
करण्याची अधिकृत घोषणा केली आहे. या शासन निर्णयाचे देवगिरी कल्याण आश्रम, हार्दिक स्वागत करीत आहे.
भगवान बिरसा मुंडा हे समस्त वनवासी समाज तसेच संपूर्ण देशवासीयांकरिता श्रद्धेय आहेत. इंग्रजांविरुद्ध आजीवन लढा दिलेले ते महान क्रांतिकारक होते. इंग्रजी सत्तेविरुद्ध संघर्ष करीत असतानाच त्यांनी धर्मांतर
तसेच वनवासी समाजातील कुप्रथांविरुद्ध आवाज उठवला. भारतीय संस्कृतीच्या रक्षण व संवर्धनाकरिता त्यांनी आजन्म प्रयत्न केले.
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात, दि. १५ नोव्हेंबर ते नोव्हेंबर २०२१ हा आठवडा वनवासी स्वातंत्र्यवीरांच्या व जननायकांच्या स्मरणाचा प्रेरक आठवडा (आयकॉनिक विक) असेल अशी घोषणा,
आज केंद्रीय मंत्री मा. अनुरागजी ठाकूर यांनी केली. देशातील तरुण पिढीला, स्वातंत्र्य संग्रामात सहभागी
झालेल्या तसेच हौतात्म्य पत्करलेल्या वनवासी क्रातिकारकांची नव्याने ओळख होईल. त्यांचे कार्य व
बलिदान युवकांना प्रेरणादायी ठरेल, ही कल्याण आश्रमाला खात्री आहे.
देवगिरी कल्याण आश्रमातर्फे, पुनश्च भारत सरकार, विशेषता मा. पंतप्रधान व मंत्रीमंडळाचे हार्दिक अभिनंदन,त्यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत, कल्याण आश्रम, १५ नोव्हेंबर हा वनवासी गौरव दिवस उत्साहात
साजरा करेल. अशी माहीती देवगिरी कल्याण आश्रम अध्यक्ष चैत्राम पवार, उपाध्यक्ष डॉ. किशोर मोरे , सचिव चैत्राम पवार,यांनी कळविले आहे .



