महाज्योती अभियाना अंतर्गत विकास आघाडीच्या माध्यमातून
सायन्सच्या विद्यार्थ्यांना मिळणार टॅबसहित सहा जीबी डेटा फ्री ;
भुसावळ – विकास आघाडीच्या माध्यमातून महाज्योती अभियानाच्या अंतर्गत राष्ट्रवादीचे छगनरावजी भुजबळ यांच्या पुढाकाराने जेईइनेट अशा परीक्षांच्या पूर्व तयारीसाठी तळागाळातील गरीब विद्यार्थ्यांना सुद्धा सक्षमतेने त्याठिकाणी परीक्षा देता यावी म्हणून ओबीसी ,व्हीजेएशटी ,एसबीसी या प्रवर्गातील 2021 म्हणजे या वर्षी ज्यांनी 11 वी सायन्स मध्ये प्रवेश घेतला असेल अशा विद्यार्थी-विद्यार्थिनींना या योजनेचा लाभ घेता येणार आहे .
याकरीता महाज्योती वेब साईटवर अर्ज केल्यानंतर एका चांगल्या क्वालिटीचं जवळपास वीस ते पंचवीस हजार किमतीची टॅब आणि त्या टॅबला लागणारा दररोज सहा जीबी डेटा मोफत मिळणार आहे .तसेच महाज्योती या पोर्टल वरून दररोज ऑनलाईन शिक्षण सुद्धा मोफत मिळणार आहे . तरी जास्तीत जास्त विद्यार्थी विद्यार्थिनींनी या महाज्योती योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन येथील माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांनी केले आहे . याकरीता वेबसाईटवर जाऊन आपला प्रवेश ऑनलाइन पद्धतीने तो अर्ज भरून मोफत मिळणाऱ्या टॅब आणि डेटा घेऊन दररोज ऑनलाईन मोफत प्रशिक्षण घ्यावं आणि येणाऱ्या काळात आपला भविष्याचा पाया मजबूतीसाठी जेईइनेट अशा परीक्षा देऊन शैक्षणिक प्रगती करीत आपल्या उज्वल भविष्यासाठी एक चांगलं पाऊल उचलावे व टॅबचां कलाभ घ्यावा असेही नेमाडे यांनी म्हटले आहे .



