जळगाव —येथील शिक्षण सहसंचालक उच्च शिक्षण विभाग जळगाव यांना भालोद येथील सामाजिक कार्यकर्ते श्री. कुंदन धर्मा तायडे यांनी पुराव्यासह निवेदन देऊन भुसावळ येथील श्रीमती प. क. कोटेचा महीला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मंगला साबद्रा यांची याचिका उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाने फेटाळल्यामुळे आता त्यांना पदावर राहण्याचा कोणताही कायदेशीर अधिकार नाही. वास्तविक विद्यापीठाने त्यांची मान्यता काढल्यामुळे त्यांनी या निर्णयाविरुद्ध औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती. मात्र खंडपीठाने 30 ऑक्टोंबर रोजी त्यांची याचिका निकाली काढल्यामुळे आता त्या मान्यताप्राप्त प्राचार्य नसल्यामुळे व विद्यापीठाने संस्थेला योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिलेले होते.मात्र संस्था त्यांचा सावधी कालावधी (Tenuear Period)संपल्यानंतर सुध्दा जाणुनबुजुन कोणतीही कार्यवाही करत नसुन त्यांना पाठीशी घालत आहे.त्यामुळे शिक्षण सहसंचालक यांनी अशा बेकायदेशीर प्राचार्यांच्या सहीचा कोणताही पत्रव्यवहार स्वीकारू नये व त्यांचे वेतन अदा करण्यात येऊ नये .अशा प्रकारचे निवेदन प्रत्यक्ष त्यांना भेटून दिले . तसेच बेकायदेशीर असलेल्या प्राचार्यांच्या वर झालेला पगाराचा खर्चसुद्धा वसूल करावा अशी मागणी केली . याबाबत आता विद्यापीठ ,शिक्षण संचालक संचालक यांनी जर चालढकल केली तर आमरण उपोषणाला बसण्याचा सुद्धा त्यांचा मानस आहे ,असे तायडे यांनी स्पष्टपणे शिक्षण सहसंचालक प्रा.डॉ.संतोष चव्हाण यांना निक्षून सांगितले व त्यांना सर्व पुराव्यासह निवेदन सादर केले.
वास्तविक त्यांची नियुक्तीसुध्दा वादग्रस्त आहे,त्यांचा ए.पी.आय. नसतांना सुध्दा त्यांची नेमणुक झालीच कशी? याबाबत सुध्दा औरंगाबाद ऊच्च न्यायालयात कुंदन धर्मा तायडे यांनी जनहित याचीका दाखल केली असुन ति प्रलंबीत आहे.याबाबत विद्यापिठाने प्रा, अमोल बोरसे यांची समिती नेमलेली होती.त्या समितीने सुध्दा या नियुक्त्या नियम धाब्यावर बसवुन केल्या असल्याबाबत प्रतिकुल अहवाल दिला आहे.तो अहवाल न्यायालयात दाखल केला असुन “सत्य परेशान हो सकता है,पराजित नही” असे कुंदन धर्मा तायडे यांनी प्रतिपादन केले.



