बोदवड : दिवाळीच्या सुटीत मामांकडे आलेला बालक मोबाईलवर गेम खेळत असताना अचानक मोबाईलचा स्फोट झाल्याने 10 वर्षीय बालक भाजल्याची घटना मंगळवारी तालुक्यातील शेलवड येथे घडली. या घटनेत प्रफुल्ल पाटील हा बालक भाजला गेला. भुसावळ तालुक्यातील सुसरी येथील प्रफुल्ल पाटील (10) हा बालक आपल्या मामांकडे दिवाळीच्या सुट्टीत आला होता. मंगळवार, 9 रोजी दुपारच्या सुमारास मोबाईलवर गेम खेळत असताना अचानक मोबाइलच्या बॅटरीचा स्फोट झाल्याने बालकाच्या हाताला व डोळ्याला इजा झाली. बालकाला तातडीने गोदावरी मेडिकल कॉलेजला उपचारासाठी हलवण्यात आले आहे. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.



