11 नोव्हेंबरला रामानुजन भारत गणित यात्रा येणार महाराष्ट्रात


भुसा‌वळ – गणित विषयाबद्दल ची भीती कमी व्हावी तसेच गणिताचा प्रचार व प्रसार संपूर्ण भारतभर व्हावा यासाठी भारताच्या स्वातंत्र्य अमृतवर्षाचे अवचित्य साधून ऑल इंडिया रामानुजन मॅथ क्लबच्या वतीने रामानुजन अमृत भारत गणित यात्रेची सुरुवात करण्यात आली आहे. सदरची यात्रा मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात येणार असुन तीन दिवसांच्या कालावधीत राज्यातील जळगाव जिल्हा येथील पाच शाळांना भेटी देणार आहे. यानंतर 15 नोव्हेंबरला ही यात्रा पुढे कर्नाटक राज्यात जाणार आहे. यात्रा भेटी दरम्यान शिक्षक व विद्यार्थ्यासाठी कार्यशाळा घेवून गणित व विज्ञान विषयाचे ट्रीक्स देण्यात येणार आहे. 

भारत देश स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करत आहे. या निमित्त गुजरात राज्यातील सोमनाथ मंदिरातून गांधी जयंतीला 2 ऑक्टोंबर 2021 रोजी रामानुजन अमृत भारत गणित यात्रा आरंभ झाली . या यात्रेचा समारोप २२ डिसेंबर 2021 रोजी महान भारतीय गणिततज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जन्मदिनी त्रीपुरा राज्यातील आगरतला येथे होणार आहे. ८२ दिवस २५ राज्यांतील ७५ शाळांमधे ही यात्रा भेट देणार आहे. महाराष्ट्र राज्यात या यात्रेचे आगमन मध्यप्रदेशातून ११ नोव्हेबरला 2021ला होणार असुन १२ ते १४ नोव्हेंबर दरम्यान महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील पाच शाळांमधे हि यात्रा भेट देणार आहे. या यात्रेसोबत संपूर्ण ८२ दिवस गुजरात मधील मेहुलकुमार हरसोला व उत्तर प्रदेशातील ब्रजेश दिक्षीत येणार आहेत. 

या यात्रेवेळी रमन सायन्स अँड टेक्नॉलॉजी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. चंद्रमौली जोशी, भोपाळ येथील राष्ट्रीय गणिततज्ञ मोहनसिंग सोलंकी, मुंबई येथील होमीभाभा रिसर्च सेंटरचे डॉ. सुधाकर आगरकर,पदविधर आमदार डॉ. सुधीर तांबे, नाशिक येथील शिक्षण उपसंचालक नितीन उपसनी, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. अनिल झोपे, विज्ञान प्रमुख प्रा. चंद्रशेखर साळूंखे, माध्यमिक शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण, प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील, जिल्हा विज्ञान पर्यवेक्षक आय.आर.शेख, भुसावळ गटशिक्षणाधिकारी किशोर वायकोळे, मुक्ताईनगर गटशिक्षणाधिकारी बी.डी.धाडी, शिक्षण विस्तार अधिकारी तुषार प्रधान, नॉस्टाॅक चे राष्ट्रीय खजिनदार किशोर राजे नॅशनल कॉन्सील ऑफ टिचर सायंटिस्ट चे राष्ट्रीय सचिव संदिप पाटील, यात्रेचे महाराष्ट्र समन्वयक सुनिल वानखेडे आदि उपस्थीत राहणार आहे. 

हि यात्रा शाळेत पोहचल्यानंतर गावातून गणित रथा सोबत रॅली काढण्यात येईल. यानंतर विद्यार्थी व शिक्षक यांचे स्वतंत्र गणित व विज्ञान विषयाची कार्यशाळा आयोजीत करण्यात येणार आहे. सदर कार्यशाळेत विद्यार्थी प्रात्यक्षिकातून गणिताचे सूत्रे शिक्षणार आहेत. 

या यात्रेसाठी डी.पी. साळूंखे, जे.पी. सपकाळे, एन.ए. पाटील, जी.डी.चौधरी, डॉ. संजू भटकर, एस.एस.अहिरे, जीवन महाजन, योगेश इंगळे,समाधान जाधव, आर.बी. इंगळे, एम.आर.चौधरी, निलीमा पाटील, दिलीप बाविस्कर, तुषार बाविस्कर, वंदना भिरूड, अनिल माळी, डॉ. प्रा. भाग्यश्री भंगाळे, शैलेंद्रकुमार भंगाळे, धिरज चौधरी, एस.बी.कुळकर्णी, प्रदिप सोनवणे, भुषण झोपे, प्रशांत नरवाडे, दिलीप जावळे, बापू चौधरी, राजेंद्र परसे आदि यशस्वीतेसाठी प्रयत्न करीत आहे. 

या शाळांना देणार भेट 

१२ नोव्हेंबर सकाळी ८ ते १२ श्री शारदा माध्यमिक विद्यालय, दिपनगर, दुपारी १ ते ५ सर्वोदय हायस्कूल, किन्ही, 

१३ नोव्हेंबर सकाळी ८ ते १ न.ह.राका विद्यालय, बोदवड, दुपारी २ ते ५ महात्मा गांधी विद्यालय, वरणगाव