भुसावळ – रायगड येथे ज्युनिअर मुले-मुली यांची राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड चाचणी कंडारी येथे २७ व २८ रोजी होणार आहे. यात सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
तालुका बॉक्सिंग असोशिएशन भुसावळ तर्फे सबज्युनिअर मुले-मुली राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धा रायगड येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड चाचणी भुसावळ तालुका बॉक्सिंग अशोशिएशन अंतर्गत येणारे सर्व बॉक्सिंग क्लब, असोशिएशनचे अध्यक्ष, चिटणीस, प्रशिक्षक यांना कळविण्यात येत आहे की, बॉक्सिंग खेळांडूची निवड चाचणी घेण्यात येणार आहे.
या सब ज्युनिअर मुले-मुलींनी चाचणी स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. २७ रोजी सायंकाळी ५.३० वाजता तसेच २८ रोजी ४.३० वाजता कंडारी येथे निवड चाचणी घेण्यात येणार आहे. भुसावळ तालुका बॉक्सिंग असोशिएशनचे राहुल घोडेस्वार, पवन शिरसाठ हे स्पर्धा निवड चाचनिचे आयोजक आहे.



