भुसावळ – आर्या फाऊंडेशन संचलित अध्ययन पॅरामेडिकल कॉलेज हॉस्पिटल तसेच भुसावळ वकील संघ आणि विधी सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त
पँन इंडिया अवरनेस आउटरीच प्रोग्राम ( Pan India , Awarness Outrich Programme )
या उपक्रमा अंतर्गत विधी मार्गदर्शन व आरोग्य तपासणी शिबिराचे समतानगर येथे रमेश मकासरे ,लक्ष्मीताई मकासरे नगरसेविका सविता अहिरे व प्रशांत अहिरे व आर्या फाउंडेशनचे अध्यक्ष उमेन्द्र वाघचौरे आणि अरुण तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली समता नगर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
प्रसंगी अँड. सौ.जास्वंदी भंडारी यांनी कार्यक्रमाच्या प्रस्तावनेत महिलांसाठी असलेल्या महत्वपूर्ण कायद्यांचे विश्लेषण करीत माहीती दिली.
याप्रसंगी प्रमुख वक्ते सरकारी वकील अँड विजय खडसे यांनी आपल्या मार्गदर्शनात पोस्को 2012 ( Protection of children from sexual offence 2012) या कायद्या अंतर्गत असलेल्या कलमां विषयी माहीती सांगून उपस्थितांचे मने जिंकून घेतले .
तदनंतर डॉ. तेजस पाटील यांनी परिसरातील शंभर रुग्णांच्या हाडांची तपासणी केली. डॉ. वंदना वाघचौरे यांनी व्यसनमुक्ती वर मार्गदर्शन केले .
अँड. रोहन सावंत यांनी कार्यक्रमांचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संदीप तायडे, पौर्णिमा पाटील,
प्रतिमा अग्रवाल, सुजाता वाघोदे ,हेमांगी दांडे ,प्रजापती तायडे, ऐश्वर्या सुरवाडे, आश्विनी निकम ,सायली साबळे, शाहीद खाटीक ,नकुल थोसर,रेखा कोलते सारीका बडे ,हर्षाली राजपूत,यांनी परिश्रम घेतले.



