भुसावळ – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने मोठ्या संख्येने गर्दी होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमांच्या आयोजनावर निर्बंध घातले आहेत.दरम्यान, उद्या १९ ऑक्टोबर रोजी ईद- ए- मिलाद (मिलादुन नबी) हा उत्सव असल्याने कोरोनाचे नियम आणि अटींच्या अधिन राहून भुसावळ येथे जुलूस काढण्यास पोलीस प्रशासनाकडून परवागनी देण्यात आली आहे. मुस्लिम बांधवांनी ईद-ए-मिलाद शांततेत साजरा करावा असे आवाहन डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे केले. यावेळी वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली मुस्लिम समाज बांधवाची बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.

दरम्यान विभागीय पोलिसअधिक्षक सोमनाथ वाघचौरे यांचे मार्गदर्शनाखाली शहरात रुट मार्च करण्यात आले . यावेळी पोलिस निरीक्षक इंगळे यांचेसह पोलिस फ़ौजफाटा सहभागी होते .


