गावठी कट्ट्यासह चॉपरने दहशत करणारे दोघ आरोपी गुन्हे शाखेच्या जाळ्यात –

यावल : तालुक्यातील अकलुद या गावी हॉटेल राजे परीसरात बेकायदा गावठी कट्टा व चॉपरच्या धाकावर दहशत माजवणा-या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सचिन ऊर्फ दादु हरिष चौधरी (19, रा.तापी नगर भुसावळ) व धिरज केशरसिंग जाधव (26, रा.मोरेश्वर नगर, भुसावळ) या दोघांना अटक केली आहे .
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली स.फौ. अशोक महाजन, हवालदार लक्षमण पाटील, नाईक श्रीकृष्ण देशमुख, नाईक रणजित जाधव, नाईक किशोर राठोड, विनोद पाटील, ईश्वर पाटील आदींनी ही कारवाई केली.