भुसावळ – शहरातील .प्रेमभाऊ कोटेचा यांना अखिल जैन समाजातून संपूर्ण भारतभरातून एकमेव समाजातील सोनेरी माणूस म्हणून गौरविण्यात आले, तसेच त्यांची अखिल भारतीय जैन श्वेतांबर स्थानकवासी जैन कॉन्फरन्स ज्ञानप्रकाश योजना राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झाल्याने जय गणेश फाऊंडेशन व जय गणेश ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या वतीने सन्मानित करण्यात आले.
त्यावेळी जय गणेश फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष श्री.उमेशभाऊ नेमाडे, अध्यक्ष श्री.धीरज धांडे, समन्वयक श्री. गणेश फेगडे सर, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री.विलास चौधरी, सचिव श्री.अशोक चौधरी, जेष्ठ समाजबांधव सुगनचंद सुराणा, बन्सीलाल चोरडिया सर, रेल सेनेचे ललीतकुमार मुथा,कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य जयंतीलाल सुराणा,बाबूसेठ चोरडिया, दिलीप ललवाणी सर,डॉ.अभय कोटेचा आणि जैन समाजबांधव तसेच जी.आर .ठाकूर, चैत्राम पवार अप्पा, तुषार झांबरे,प्रविण पाटील, संतोष भंगाळे आणि जय गणेशज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.



