भुसावळ – कोरोना काळात (वर्ष २०२०) दैनिक सकाळ मध्ये जेष्ठ पत्रकार श्रीकांत जोशी यांच्या प्रसिद्ध झालेल्या विविध सकारात्मक बातम्यांवर आधारीत ‘कोरोना-बंदी नव्हे संधी’ हे पुस्तक भुसावळच्या मैफल प्रकाशने प्रकाशित केले आहे. या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा दि. १९ ऑक्टोबर २०२१ मंगळवार रोजी
श्री. राध्येश्यामभाऊ लाहोटी (अध्यक्ष भुसावळ शहर व्यापारी मंडळ) यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी
अॅड. नितीनजी खरे (ज्येष्ठ पत्रकार व सरकारी वकील) तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य जी.डी. कुलकर्णी (सरस्वती विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, यावल)
राहतील.
ठिकाण माहेश्वरी भवन, राम मंदिर वॉर्ड, कासार गल्ली, भुसावळ.
वेळ सकाळी दहा वाजता. कार्यक्रम ठिकाणी पुस्तक विक्रीची सोय केली आहे. उपस्थितीचे आवाहन काशिनाथ भारंबे (निर्मोही) मैफल प्रकाशन, भुसावळ.
श्री. विलास जोशी (कुटूंब प्रमुख-जोशी परीवार)
श्रीकांत जोशी (लेखक) आयोजकांनी केले आहे .



