भुसावळ – कृषी उत्पन्न बाजार समिती येथे फळे, भाजीपाला मार्वेâट लोकार्पण सोहळा सकाळी ११.०० वाजता मान्यवरांच्या उपस्थित करण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानी माजी आ. संतोष चौधरी, तर प्रमुख पाहुणे म्हणून इजाज अब्दुल गफ्फार मलिक, पंढरीनाथ पाटील, हाजी इकबाल बागवान, सुधाकर जावळे, संतोष त्र्यंबक चौधरी, नितीन धांडे, सचिन चौधरी, अशोक पाटील, नितीन पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
आगामी नगरपालिकेत कुणी कितीही प्रयत्न केलेत तरीही आपलीच सत्ता बसेल. मात्र यावेळी सचिन चौधरी नगराध्यक्ष बनणार. काही लोक वेगळ्या पद्धतीने काम करता आहेत. काही लोक पक्षात येवून रिकामे कामे करीत आहेत. भुसावळ तालुक्याचा जो काही निर्णय घ्यायचा आहे त्यामध्ये बाहेरच्या लोकांचा हस्तक्षेप सहन करणार नाही. शहरात बाहेरचे भरपूर आले आणि गेले. काहींनी पालकांच्या नांदी लागू असे सांगितले. पालक आणि मेथी दोघेही पाहिले आहे. कित्येक पालक पाहिले मात्र आतापर्यंत कित्येक मेथी विवूâन टाकली आहे. शहरात येवून बोलणे ठिक आहे. त्यांना पक्ष वाढवायचा आहे. त्यांनाही काही जागा देवू जे आपल्याकडे आले त्यांना सामावून घेण्याचे काम करण्यात येईल. एकनिष्ठ असेल तरच त्यांना सामावून घेतले जाईल. जे सकाळी इकडे, दुपारी तिकडे, संध्याकाळी तिकडे असे लोक चालणार नाहीत. अशा लोकांना स्वीकारणार नाही. तिकडे काहीही व्होवो, निवडणूक लढतांना अनेक लोक अंगावर घेतले आहेत. चांगले चांगले पाहिले आहेत. त्यांचीही चिंता करीत नाही. जनतेच्या व नागरिकांच्या आशिर्वादीने एकटे लढण्याची तयारी ठेवतो. एकच विनंती आहे जे आले त्यांनी चांगल्यापद्धतीने रहा, काम करा, इकडे आले तर इकडेच रहा, नाहीतर अर्धमन इकडे अन् अर्धमन तिकडे असे चालणार नाही. एकनिष्ठ रहाणे गरजेचे आहे.
शहरातील जनता हैराण असून, त्रस्त आहे. आज तापीनदीचे पाणी पंधरा दिवसांनी भेटत आहे. थोडे दिवस थांबा जे काम थांबलेले असेल ते होतील. नगरपालिकेत टेकनिकल कामांसाठी काही पैसे लागायचे नाही. आता तर एक टक्का लागतो. त्यानंतर कमिशन वाढत वाढत ९०टक्के निघून जाते. इतकी परिस्थिती बिकट आहे. जयंत पाटील यांनी सांगितले की, काही लोकांना सांभाळून घ्या. तर आपण सांभाळून घेवू मात्र आतून जे गडबड करणारे आहेत त्यांना असे वाटते की, हा आणि तो तिकीट वाटणार आहे. कुणीही तिकीट वाटणार नाही. भुसावळ तालुक्यात जे तिकीट वाटायचे असेल ते मी वाटेल, असेही संतोष चौधरी यांनी सांगितले.

जे निवडणूक येतील आणि ज्यांच्यात ताकद आहे त्यांनाच तिकीट दिले जाईल. जो जनतेसाठी रात्रंदिवस काम करेल तोच तिकीटासाठी पात्र राहणार. कुणी कितीही जवळचा असला तरी मला पहा अन् पुâले वहा असे मुळीच चालणार नाही. जनतेची कामे झाली पाहिजेत. हेच धोरण कायम असणार आहे.
अमृत योजनेचे कामात आधी पाईपलाईन नंतर टाकीचे काम मात्र पाणी कोठून उचलायचे त्याचा स्त्रोत नाही. १४ कोटींची योजनाही २१४ कोटींवर गेली. दोनदा यावल रस्त्याचे खोदकाम झाले. तरीही रस्त्याचे बारा वाजले. दीड दीड कोटी असे तीन कोटी शहरातील यावल रस्त्यावर वाया गेले. फक्त टेंडर बिल काढण्याचा प्रकार सुरू आहे. वंâत्राटदारांना बोलण्याची हिमंत नाही. त्याच्याकडून एवढे घेतले जाते की त्यास बालण्यास जागाच उरत नाही. चांगल्या प्रकारचा विकास करायचा असेल तर चांगले व काम करणारे लोक आपल्याला निवडून द्यावे लागतील, असे माजी आमदार संतोष चौधरी यांनी सांगितले.
कृषी उत्पन्न बाजार समिती येथे फळे, भाजीपाला मार्वेâट लोकार्पण सोहळ्याप्रसंगी आडत व्यापारीवर्ग, शेतकरी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


