भुसावळ : शिवपूर-कन्हाळा राेडवरील शाळेच्या मागे साजीद याच्या बंद घरात प्रकाश दत्तू अहिरे यांनी जुगाराचा अड्डा भरविला असल्याची माहिती बाजारपेठ पाेलिसांना मिळाल्यावर गुरूवारी सायंकाळी सहाच्या सुमारास अचानक छापा टाकण्यात आला. यात १२ जणांविरूध्द बाजारपेठ पाेलिस ठाण्यात गुरूवारी रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला. यावेळी १३ हजार ४२० रूपये राेख व ४३ हजार ५०० रूपये कींमतीचे १२ माेबाईल आणि चार लाख रूपये कींमतीच्या आठ माेटरसायकली असा चार लाख ५६ हजार ९२० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. यामुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे

. पाेलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून शिवपूर-कन्हाळा राेडवरील शाळेच्या मागे साजीद नावाच्या व्यक्तीच्या घरात प्रकाश अहिरे यांनी जुगार सुरू केला असल्याची माहिती डीवायएसपी साेमनाथ वाघचाैरे यांना मिळाल्याने त्यांनी बाजारपेठ पाेलिसांना माहिती दिल्यावरून पाेलिसांनी गुरूवारी सायंकाळी सहाच्या सुमारास जात अचानक छापा टाकला. यात प्रकाश दत्तू अहिरे, गणेश रामदास इखारे, फरीद शहा बशीर शहा, दत्ता वना तायडे, मिलींद देवराम पाताेडे, लक्ष्मण सुकदेव लाेडते, विक्रम संताेष वाहूलकर, ईश्वर सुकदेव लाेढे, प्रदीप डीगंबर भुसारे, भगवान हिरामण पाटील, गाेपाळ शेणफडू सजाेले, सचिन बबन देशमाने यांच्याविरूध्द बाजारपेठ पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पाेलिसांनी केलेल्या कारवाईमुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यामध्ये खळबळ उडाली आहे. पाेलिसांनी गुन्हा दाखल करून सर्व संशयीतांना जामीनावर साेडले. डीवायएसपी वाघचाैरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.


