भुसावळात रात्री स्पिकर वाजविण्यास मनाई केल्याने पाेलिसांना धक्काबुक्की : सात जणांविरूध्द गुन्हा ;


भुसावळ : शहरातील हनुमान नगरातील पंचवटी गृपच्या तकदीर मंडळासमाेर शुक्रवारी रात्री स्पिकर लावून गरबा खेळत असलेल्या व नाचत असलेल्यांना स्पिकर बंद करण्याच्या सूचना केल्या असता पाेलिस अधिकारी व कर्मचारी यांना धक्काबुकी करण्याची घटना घडली.

या प्रकरणी फाैजदार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बाजारपेठ पाेलिस ठाण्यात सात जणांविरूध्द सरकारीकामात अडथळा निर्माण करणे, दंगल घडविणे, पाेलिसांच्या अंगावर जाणे अादी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पाेलिसांनी तीन संशयीतांच्या मुसक्या आवळल्या आहे. बाजारपेठ पाेलिस ठाण्यातील फाैजदार शांताराम महाजन हे शूक्रवारी रात्री गस्तीवर निघाले असता, हनुमान नगरातील पंचवटी गृपच्या तकदीर मंडळासमाेर सार्वजनिक जागेवर गरबा व दांडीया खेळत हाेते, दांडीया, गरब्यास कुठलीही परवानगी नसतांना मंडळाचे पदाधिकारी यांनी स्पिकर लावले हाेते, यावेळी फाैजदार महाजन यांनी पदाधिकाऱ्यांना स्पिकर बंद करण्याच्या सूचना रात्री १२. ३० वाजता दिल्यात. मात्र पाेलिसांच्या सूचनाकडे लक्ष न देता युवक नाचत हाेते, त्यामुळे फाैजदार महाजन यांनी डीवायएसपी साेमनाथ वाघचाैरे, निरीक्षक प्रताप इंगळे यांना माहिती दिली. यामुळे डीवायएसपी वाघचाैरे, निरीक्षक इंगळे हे हनुमान नगरात काही वेळातच दाखल झाले. पाेलिसांनी त्यांना स्पिकर बंद करण्याच्या सूचना केल्यात मात्र तेथे माेठ्या प्रमाणावर जमाव जमला हाेता. यावेळी युवकांनी रात्रीच्या वेळी आरडाओरड केली हाेती. सहायक फाैजदार अनिल चाैधरी, दिनेश कापडणे, गजानन गाडगीळ यांना धक्काबुक्की केली. यावेळी गर्दीतील एक जण म्हणत हाेता, थांबा मी घरून पिस्ताेल घेऊन येताे व पाेलिसांना पाहताे, असे म्हणून ताे गर्दीतून गायब झाला. तर यावेळी ऋषी शुक्ला हा जमावाला चिथावणी दिली. यावेळी पाेलिसांनी स्पिकर व ऍम्प्लिफायर जप्त केले आहे. या प्रकरणी सहायक पाेलिस निरीक्षक हरीश भाेये पुढील तपास करीत आहे.
पाेलिस उपनिरीक्षक महाजन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बाजारपेठ पाेलिस ठाण्यात धीऱज विजयसिंग राजपूत (रा. हनुमान नगर, भुसावळ), किरण भागवत कलाल (रा.साईबाबा मंदीराजवळ, साई शंकरनगर, भुसावळ), ऋषी दुर्गाप्रसाद शुक्ला (रा. हनुमान नगर, भुसवळ) व प्रशांत उर्फ गाेलू युवराज ठाकूर (रा.भुसावळ ) व त्यांच्या साेबत तीन अनाेळखी व्यक्ती हाेते.
पाेलिसांनी याप्रकरणी धीरज राजपूत, कीणण कलाल व ऋषी शुक्ला यांना ताब्यात घेत पाेलिसांनी अटक केली आहे. शहरातील ही दादागिरी कायद्याचा आधार घेत माेडीत काढली जाईल, असे डीवायएसपी साेमनाथ वाघचाैरे यांनी सांगितले. पाेलिसांशी धक्काबुक्की केल्यावर काय हाेते, हे त्यांना दाखविले जाईल, पाेलिसांना धक्काबुक्की करणे, नियमांचे उल्लघण करणे हे समाजाला चुकीचा संदेश देणारे असल्याने अश्याविरूध्द कडक कारवाई हाेईल, अन्य तीन जण पळून गेले असलेल्याचाही शाेध घेतला जात आहे, असे डीवायएसपी साेमनाथ वाघचाैरे यांनी सांगितले.