आंतरराष्ट्रीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा : भारतीय संघाचे तिन्ही गटात निर्विवाद वर्चस्व : जिल्ह्यातील खेळाडूंनी गाजवले नेपा़ळला मैदान:

भुसावळ:- नेपाळ येथील पोखराला आंतरराष्ट्रीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा चे आयोजन करण्यात आले होते, स्पर्धा मुले-मुली खुला गट, १९ व १६ वर्षाच्या आतील अशा चार गटात झाली . खुल्या गटात मुले व मुली तसेच १९ वर्षातील गटात भारताने नेपाळला धोबीपछाड दिली, तर १६ वर्षातील गटात भारतीय संघाला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
भारतीय टेनिस बॉल क्रिकेट संघटनेच्या अंतर्गत नेपाळ टेनिस बॉल क्रिकेट संघटना आयोजित आंतरराष्ट्रीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा पोखरा ला संपन्न झाली, स्पर्धा चार वेगवेगळ्या गटात झाली यातील तीन गटात भारताने नेपाळला धूळ चारली तर १६ वर्षातील गटात भारतीय संघाला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. स्पर्धेत चारही गटामध्ये जिल्ह्यातील खेळाडूंनी नेत्रदिपक कामगिरी केली.

स्पर्धेतील निकाल
मुलांच्या खुल्या गटामध्ये जिल्ह्यातील रोहन धनगर, जितेंद्र पावरा, कार्तिक पाटील यांचा सहभाग होता अंतिम सामन्यात खुल्या गटामध्ये भारतीय संघाने नेपाळचा १२ धावांनी पराभव केला.

मुलींचा संघ विजयी

भारत व नेपाळ यांच्यात झालेल्या अंतिम सामन्यात मुलींच्या गटात भारतीय संघाने ७ गडी राखून नेपाळचा पराभव केला, यामध्ये जिल्ह्यातील गार्गी पाटील, कार्तिकी चौधरी ,कामिनी पाटील, शरायु बाविस्कर या मुलींचा समावेश होता.

ज्युनिअर गटात हि भारतीय संघाचा विजय

१९ वर्षाआतील अर्थात ज्युनिअर गटामध्ये यजमान नेपाळ व भारत संघात झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने एकतर्फी नेपाळचा ३० धावांनी पराभव केला. या संघात जिल्ह्यातील भावेश कोळी, चेतन सोनवणे, मनीष धांडे, दुर्गेश येवलकर या खेळाडूंचा समावेश होता.

सब जूनियर संघ दुसऱ्या स्थानी

१६ वर्षाच्या आतील अर्थात सब- ज्युनिअर गटातील क्रिकेट स्पर्धेत ८ धावांनी भारतीय संघाला नेपाळ संघाकडून प्रभाग स्वीकारावा लागला.
या संघात आयुष पाटील, लोकेश पाटील, कौशल भोई ,प्रणव चव्हाण, महेश पाटील, तन्वीर तडवी, मिरजान व साहिल तडवी, अनिश तडवी जिल्ह्या सह राज्यातील खेळाडूंचा भारतीय संघात समावेश होता.

भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून वासेफ पटेल यांनी काम बघितले तर ज्युनियर संघाचे प्रशिक्षक म्हणून मनोज जाधव यांनी कामगिरी बजावली.