भुसावळ – आयुध निर्माणी मध्ये दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर डिजिटल माध्यमात द्वारा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व रक्षा मंत्री राजनाथ सिंह यांच्या द्वारा देशांमधील 41आयुध निर्माणीया सात विभागांमध्ये निगमीकरण करून देशाला समर्पित करण्यात आल्या या मध्ये
आयुध निर्माणी भुसावळ येेथे कार्यक्रमा साजरा करण्यात आला .

सदर कार्यक्रमाच्या अगोदर शस्त्रपूजन महाप्रबंधक वसंत निमजे यांनी केले व श्रीमती रजनी सावकारे व श्रीमती वैजयंती निमजे अध्यक्षा महिला कल्याण समिती
आयुध निर्माणी भुसावळ यांच्या हस्ते
दीप प्रज्वलन व पूजन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली सदरच्या कार्यक्रमात भुसावळ शहरातील श्रीमती रजनी सावकारे .
कर्नल राजू चौधरी कमांडिंग अधिकारी .
नवीन पाटील ए.डी.आर.एम. व सोमनाथ वाघचौरे सब डिव्हिजनल पोलीस अधिकारी.
राकेश कुमार इन्चार्ज प्रिन्सिपल.
श्रीमती वैजयंती निमजे अध्यक्षा महिला कल्याण समिती यांनी प्रमुख उपस्थिती दिली
आपल्या भाषणात नरेंद्र मोदी यांनी सांगितले की निगमीकरणामुळे कामगारांचे हित हे अबाधित राहणार आहे व पूर्ण स्वायत्तता मिळून देशाला आत्मनिर्भर होण्यास मदत होणार आहे आपल्या देशाच्या विकासासाठी व संरक्षण क्षेत्राच्या आधुनिकीकरणा साठी हे उचललेले पाऊल महत्त्वाचे ठरणार आहेत त्यांनी विश्वास दिला की निगमीकरणामुळे देशाच्या विकासाला मोठा हातभार लागणार आहे तसेच रक्कम रुपये 65000 कोटी निगमीकरणाच्या सक्षमीकरणला
देण्यात आलेले आहेत
कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता
वसंत निमजे महाप्रबंधक यांचे विशेष मार्गदर्शन लाभले तसेच
राजीव कुमार अप्पर महाप्रबंधक , नीलाद्री विश्वास अप्पर महाप्रबंधक , कर्नल सुशील कुमार .
बी देविचंद , उप महाप्रबंधक तरुणकुमार प्रशासकीय अधिकारी सहित सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.


