आज 13 रोजी ऑनलाईन शिक्षण संवाद


भुसावळ – तब्बल दीड वर्षानंतर शाळेत परतलेल्या विद्यार्थ्यांसह त्यांचे पालक, शिक्षक तसेच शिक्षणक्षेत्रातील अधिकारी यांच्यासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जळगाव तथा डायट यांच्यातर्फे ऑनलाईन शिक्षण संवाद या उपक्रमाचे आयोजन आज बुधवार, दि. 13 ऑक्टोबर 2021 रोजी दुपारी 12 वाजता करण्यात आले आहे. त्याअंतर्गत ‘चला शाळेत रमूया’ या विषयावर शिक्षणतज्ज्ञ डॉ. श्रुती पानसे संवाद साधणार आहेत.

हा शिक्षण संवाद झूम ॲप व यूट्यूबद्वारे लाईव्ह राहिल. शिक्षणप्रेमींनी यात मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयोजक जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. अनिल झोपे, उपक्रम समन्वयक डॉ. जगदीश पाटील व तंत्र सहाय्यक राहूल चौधरी यांनी केले आहे.