भुसावळ- येथील श्रीमती पि.के. कोटेचा महिला महाविद्यालयाचे माजी प्रभारी प्राचार्य प्रा.डॉ.डि.एम.ललवाणी यांना राजनंदिनी बहुद्देशीय संस्था यांच्यातर्फे जाहीर करण्यात आलेल्या राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला.या पुरस्कार प्रसंगी श्री राजपूत करणी सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष बी. एस .खंडाळकर, विलास सिंह पाटील ,सुमित पाटील ,साहीत्यीक ऐ. एफ भालेराव , यावल येथील माजी प्राचार्य प्राध्यापक सुरेश वाघ ,राजपूत करणी सेना खानदेशी विभागाचे अध्यक्ष प्रवीण सिंग पाटील, गणेश अमृतकर ,सिंगल वुमन फौंडेशनच्या मिनाक्षी चव्हाण,ग.स.सोसायटीचे माजी अध्यक्ष मनोज पाटील,पत्रकार ज्ञानेश्वर वाघ आदी मान्यवर ऊपस्थित होते. प्राध्यापक ललवाणी यांनी यांनी केलेले सामाजिक धार्मिक आध्यात्मिक व शैक्षणिक कार्य या सर्वांचा साकल्याने विचार करून सदर पुरस्कार त्यांना जाहीर करण्यात आला होता.ललवाणी यांनी मनोगत व्यक्त करुन सर्व ऊपस्थितांची मने जिंकुन आत्मपरीक्षण करण्यास ऊद्युक्त केले,



