भुसावळ – येथिल सामाजीक क्षेत्रात नेहमी अग्रेसर राहणाऱ्या वंदना अनंत सोनवणे यांची नुकतीच वंचित बहुजन महिला आघाडीच्या जळगांव जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यांची ही निवड वंचीत बहूजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या सुचनेनुसार प्रभारी महिला प्रदेश अध्यक्षा रेखा ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली महासचीव अरूंधती शिरसाठ,उपाध्यक्ष सविता मुंडे,डॉ.निशा शेंडे या सर्वांच्या सहमतीने करण्यात आली.
तसेच जिल्हा उपअध्यक्षा आशा सोनवणे,मिरा वानखेडे,महासचिव जरिना तडवी,वंदना आराख संघटक शोभा सोनवणे,प्रसिद्धी प्रमुख दिपाली बारे यांची ही निवड करण्यात आली.
………………………..



