मध्य रेल्वेतील सप्टेंबर महिन्यातील आतापर्यंतची सर्वोत्तम आणि एप्रिल-सप्टेंबर कालावधीतील आतापर्यंतची सर्वात जास्त मालवाहतूक केली असून यामध्ये मध्य रेल्वेने एप्रिल-सप्टेंबर २०२१- २२ मध्ये ३५.६% अधिक मालवाहतूक लोडिंग केले.

मध्य रेल्वेत सप्टेंबर २०२१ मध्ये झालेली मालवाहतूक हि सप्टेंबरमधील झालेली आतापर्यंतची सर्वात चांगली लोडिंग आहे. मध्य रेल्वेने सप्टेंबर २०२१ मध्ये ५.४४ दशलक्ष टन मालवाहतूक केली.
एप्रिल ते सप्टेंबर २०२१ (आर्थिक वर्ष २०२१- २२ च्या पहिल्या सहामाहीत) कालावधीत, मध्य रेल्वेने ३४.८५ दशलक्ष टन लोड केले जे मागील आर्थिक वर्षाच्या म्हणजेच २०२०-२१ मधील २५.७१ दशलक्ष टनांच्या तुलनेत ३५.६% वाढ नोंदवली आहे. एप्रिल- सप्टेंबर २०२१ या कालावधीत लोड होणाऱ्या प्रमुख वस्तूंमध्ये कोळसा १८.२४ दशलक्ष टन, कंटेनर ४.७९ दशलक्ष टन, सिमेंट ३.४७ दशलक्ष टन, लोह आणि स्टील १.४१ दशलक्ष टन, साखर १.०७ दशलक्ष टन, कांदा ०.५० दशलक्ष टन आणि ऑटोमोबाईल ०.२९ दशलक्ष टन यांचा समावेश आहे.
मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक श्री अनिल कुमार लाहोटी म्हणाले की, रेल्वेने होणारी मालवाहतूक हा ग्राहकांसाठी उपलब्ध असलेली सुरक्षित, जलद आणि पर्यावरण अनुकूल पर्याय आहे. ते असेही म्हणाले की, मध्य रेल्वे महसूल वाढवण्यासाठी सर्व शक्य मार्ग शोधत आहे. पावसाळा असूनही, मध्य रेल्वे टीमने मालवाहतूक लोडिंगला चालना देण्यासाठी सर्वोत्तम कामगिरी केली आणि नवीन (माल)वाहतूक करण्यासाठी निवडला.
बिझनेस डेव्हलपमेंट युनिट्स (बीडीयू) ने मुंबई विभागातून जिप्सम, अमोनिया गॅस, गॅल्वनाइज्ड स्टील कॉइल, मिल स्केल, कार्बन ब्लॅक फीड स्टॉक; नागपूर विभागातून नट कोक (मेटलर्जिकल कोक); गुरूमार्केट, पुणे विभागातून
दर्शन, बांगलादेश करीता साखरेची पहिल्यांदाच वाहतूक केली आहे. अहमदनगर, सोलापूर विभागातून मध्य रेल्वेच्या मालवाहतुकीत प्रथमच खताची लोडिंग केली ज्यामुळे या अजोड कामगिरीला साहाय्य मिळाले. मध्य रेल्वेने जेएनपीटी येथून डिडब्लूएआरएफ कंटेनर ट्रेनचे लोडिंग सुरू केले आहे ज्यामुळे दुहेरी स्टॅक केल्यावर व्हॉल्यूम वाढण्यास मदत होईल. यामुळे स्पर्धात्मक खर्चाचा फायदा आणि अंतर्देशीय रसद कमीत कमी खर्चात पुरवता येते .
सप्टेंबर महिन्यामध्ये मुंबई विभागाने १.३३ दशलक्ष टन, तर भुसावळ विभागाने ०.५१ दशलक्ष टन, नागपूर विभागाने २.९६ दशलक्ष टन, पुणे ०.१७ दशलक्ष टन आणि सोलापूरने ०.४७ दशलक्ष टन लोडिंग साध्य केले आहे.
आर्थिक वर्ष २०२१-२२ च्या पहिल्या सहामाहीत, मध्य रेल्वेच्या ३४.८५ दशलक्ष टन लोडिंग मध्ये मुंबई विभागातील ८.३० दशलक्ष टन, भुसावळ विभागातील २.८० दशलक्ष टन, नागपूर विभागातील १९.४९ दशलक्ष टन, पुणे विभागातील ०.८९ दशलक्ष टन आणि सोलापूर विभागातील ३.३७ दशलक्ष टन लोडिंगचा समावेश आहे.


