जळगाव – नारी शक्ती गृप जळगाव तर्फे बेघर निवारा केंद्रातील आजी-आजोबांसाठी नेत्र तपासणी शिबिर व चष्मे वाटप हा स्तुत्य उपक्रम मांगीलालजी बाफना नेत्रपेढी जळगाव येथे दिनांक 30 रोजी घेण्यात आला . यात आदित्य ढवळे पाटील, बहुद्देशीय सेवाभावी संस्था बेघर निवारा केंद्र येथील एकूण 32 जणांची नेत्र तपासणी करण्यात आली . सदर नेत्र तपासणी केशव स्मृती प्रतिष्ठान व आर सी बाफना फाऊंडेशन संचलित मांगीलालजी बाफना नेत्रपेढी व चिकित्सालय या ठिकाणी डॉ.नयना उभाड पाटील एम. एस.ऑप्थो. यांनी केली. या उपक्रमाची संकल्पना नारीशक्ती अध्यक्ष सौ मनिषा पाटील व सौ सुमित्रा पाटील यांची असून यात नारीशक्ती पदाधिकारी अध्यक्ष सौ मनीषा पाटील, गायत्री पाटील म न पा व्यवस्थापक राजश्री डोलारे ,भावना चौहान, ॲड वैशाली बोरसे,नूतन तासखेडकर, माधुरी शिंदे, तसेच किरण तोडकरी, मनोज कुलकर्णी व दीपक चौधरी यांचे सहकार्य लाभले. नारीशक्ती गृप जळगाव यांचे सर्व स्तरातुन कौतुक होत आहे.



