हरताळा शिवारातील शेतात वीज पडून शेतकर्‍याचा मृत्यू :

मुक्ताईनगर : तालुक्यातील हरताळा शिवारात वीज कोसळल्याने शेतकर्‍याचा मृत्यू झाला.
शुक्रवार 1 रोजी दुपारी अडीच वाजता ही घटना घडली. या घटनेत अजय रुस्तम घोडकी (38, रा.निमखेडी खुर्द) असे मयत शेतकर्‍याचे नाव आहे. निमखेडी खुर्द येथील शेतकरी अजय रुस्तम घोडकी हे शुक्रवारी दुपारी हरताळा शिवारातील स्वतःच्या शेतामध्ये काम करत असताना विजांच्या गडगडाटात पावसाला सुरूवात होताच वीज कोसळल्याने शेतकर्‍याचा मृत्यू झाला. मुक्ताईनगर येथील ग्रामीण रुग्णालयात मृतदेह शवविच्छेदनासाठी हलवण्यात आला आहे.