भारतीय जनता पार्टी भुसावळ शहर तर्फे असंघटीत कामगारांसाठी इ-श्रम कार्ड नोंदणी महामहोत्सवाची उत्साहात सुरवात :

भुसावळ – भारतीय जनता पार्टी भुसावळ शहर तर्फे माजी प्रभारी नगराध्यक्ष युवराज लोणारी व माजी नगरसेविका सौ.मीनाताई लोणारी यांच्या सौजन्याने “असंघटित कामगार नोंदणी व इ-श्रम कार्ड महामहोत्सव” आयोजित करण्यात आला होता

कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून रावेर लोकसभा मतदार संघाच्या खासदार श्रीमती रक्षाताई खडसे तर उद्घाटक म्हणून आमदार संजय सावकारे,शहराध्यक्ष परिक्षित बऱ्हाटे यांची विशेष उपस्थिती होती.

भारताचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या ७१ व्या वाढदिवसानिमित्त “सेवा व समर्पण” अभियाना अंतर्गत आज असंघटीत क्षेत्रातील कामगारांसाठी केंद्र सरकारने नव्याने सुरु केलेल्या ई-श्रम योजने अंतर्गत मोफत “ई-श्रम कार्ड नोंदणी अभियान” महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

आपल्या भाषणात खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी सदर ई-श्रम योजना तसेच ई-श्रम कार्ड चे महत्व व भविष्यात असंघटीत कामगारांना केंद्राच्या विविध योजनांचा थेट लाभ होण्यासाठी सदर कार्ड किती उपयुक्त आहे या बद्दल सविस्तर माहिती दिली.तर आमदार संजय सावकारे यांनी समाजातील शेवटच्या व्यक्ती पर्यंत मोदी सरकारच्या विविध योजना पोहचवून श्रमिक बांधवांच्या आयुष्यात बदल होण्यासाठी आगामी काळात भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून संपूर्ण भुसावळ शहरात हा कार्यक्रम घेण्यात असल्याचे घोषित केले.

कार्यक्रमास उपनगराध्यक्ष सौ सोनीताई बारसे,भाजप जिल्हा सरचिटणीस शैलेजाताई पाटील, माजी नगरसेविका मीनाताई लोणारी, नगरसेवक राजेंद्र नाटकर, प्रा.दिनेश राठी, महेंद्रसिंग ठाकूर,राजेंद्र आवटे,संतोष बारसे, सतीश सपकाळे,लक्ष्मण सोयंके, महिला मोर्चा अध्यक्षा अनिताताई आंबेकर, भाजप सरचिटणीस रमाशंकर दुबे, संदीप सुरवाडे, कायदे आघाडीचे शहराध्यक्ष अॅड.अभिजीत मेने, अनुसूचित जाती शहराध्यक्ष राहुल तायडे, भाजपयुमो शहराध्यक्ष अनिरुद्ध कुळकर्णी, विलास अवचार, धनराज बाविस्कर, जयंत माहुरकर संजय बोचरे शिशिर जावळे नरेंद्र बऱ्हाटे, गोपीसिंग राजपूत, अमित असोदेकर, सरचिटणीस नंदकिशोर बडगुजर, कपिल लोणारी, गौरव लोणारी,चेतन सावकारे, इरफान गवळी,कृष्णा शिंदे,प्रविण कुटे,सागर जाधव तसेच स्थानिक नागरिक ,असंघटीत क्षेत्रातील कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.