भुसावळ येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात लोकन्यायालयचे कामकाज संपन्न :

भुसावळ -येथील न्यायालयात शनिवारी रोजी लोकन्यायलयचे कामकाज सम्पन झाले. सदर
लोकन्यायालयात कोर्टातील प्रलंबभीत 118 खटले तर प्रिलीटीगेशन चे 35 खटले असे एकूण 153 खटले निकाली निघाले.तसेच तडजोडपोटी एकूण रक्कम रु 3 कोटी 32 लाख 63 हजार 825 वसूल करण्यात आली.
लोकन्यायालयात एकूण तीन पॅनेल द्वारा कामकाज करण्यात आले.
पॅनेल क्र.१ चे कामकाज पॅनेल प्रमुख न्यायाधीश आर.आर. अहिर आणि पॅनेल सदस्य ऍड. अभिजीत.अ.मेने यांनी केले.
पॅनेल क्र.२ चे कामकाज पॅनेल प्रमुख न्यायाधीश व्ही.जी.चौखंडे आणि पॅनेल सदस्य ऍड. इसरार. शेख यांनी केले.
पॅनेल क्र.३ चे कामकाज पॅनेल प्रमुख न्यायाधीश श्रीमती डी एम शिंदे आणि ऍड. स्वप्नील. सोनार यांनी केले.
सदर कामकाज यशस्वी करणेसाठी नियुक्त असलेले न्यायालतील कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.