भुसावळ -भुसावळ शहरातील आर्म अँक्ट नुसार दाखल असलेल्या गुन्हेगार तसेच भुसावळ शहर व बाजारपेठ पोलीस स्टेशन हद्दीतील शस्त्र अधिनियम कलम 3,25 खाली दाखल गुन्ह्यातील आरोपी यांची उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 25 सप्टेंबर शनिवार रोजी सायंकाळी 4 ते 6 वाजे दरम्यान भुसावळ शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी ओळख परेड घेण्यात आली.
भुसावळ शहरातील आर्म अँक्ट नुसार दाखल असलेल्या गुन्हेगाराचा शोध पो नि भागवत , इंगळे व बाजारपेठ, शहर पोलीस स्टेशनचा स्टाफ यांच्या टिमने एकून 29 गुन्हेगारांना शहर पोलीस स्टेशनला उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या समक्ष हजर केले.

यावेळी प्रत्येक गुन्हेगारांचे माहीती अर्ज (introgetion form) भरून घेण्यात आले. त्यात संबंधित गुन्हेगार व्यक्ती सद्यस्थितीत कोणा सोबत राहतात, कोणती गाडी वापरतात, कोणता मोबाईल वापरतात, त्यांचे मित्र कोण आहेत आदीं सर्व बाबींची बारकाईने विचारपूस करून त्यांचे फोटो घेण्यात आले व प्रत्येकावर कोणती प्रतिबंधक कारवाई करावी या बाबत आढावा घेण्यात आला. याशिवाय यातील जे गुन्हेगार चांगल्या कामधंद्याला वा उद्योग व्यावसायास लागले आहेत त्यांना चांगल्या वर्तणुकीची समज देण्यात आली व उर्वरित गुन्हेगारांवर पुढील आठवड्यामध्ये प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच आगामी कालावधीमध्ये येणारा दुर्गा उत्सव त्याचप्रमाणे शहरातील नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर 30 विभागाकडून रेकॉर्डवरील सर्व गुन्हेगारांवर व त्यांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असल्याचे सुत्राणी सांगीतले ..


