भुसावळ – येथील भुसावळ कला, विज्ञान आणि पी.ओ. नाहाटा वाणिज्य महाविद्यालय, भुसावळ येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने 24 रोजी एन. एस. एस. स्थापना दिन उत्साहात साजरा झाला. त्याप्रसंगी वराडसीम दत्तक गावात स्मशानभुमीची स्वच्छता करून अंधश्रद्धा निर्मूलनाचा संदेश देण्यात आला. त्यानंतर गावातून रॅलीद्वारे जनजागृती करण्यात आली. सदर रॅलीला वराडसीम चे सरपंच सौ.प्रतिभा जंगले यांनी हिरवा झेंडा दाखवला. त्यानंतर रॅली द्वारे गावात कोविड-19 बाबत जनजागृती करण्यात आली. तसेच वाचन संस्कृती वाढवण्यासाठी ठिकठिकाणी पथनाट्य सादर करण्यात आले.
दुपारच्या सत्रात कवयित्री बहिणाबाई ग्राम वाचन कट्ट्याचे उद्घाटन करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. ए. डी. गोस्वामी हे होते. कार्यक्रम प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून राष्ट्रीय सेवा योजनेचे भुसावळ विभागीय समन्वयक प्रा. डॉ. पी.ए.अहिरे हे होते, तसेच वराडसिम ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. प्रतिभा जंगले व पंडित नेहरू विद्यालयाच्या पर्यवेक्षक सौ.एम.जे. चौधरी मॅडम उपस्थित होत्या. तसेच राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. राजेंद्र नाडेकर, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ.विलास महिरे, महिला कार्यक्रमाधिकारी डॉ. ममताबेन पाटील, व एन. एस. एस. चे स्वयंसेवक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.राजेंद्र नाडेकर यांनी केले. कार्यक्रमाची भूमिका स्पष्ट करून एन. एस. एस. स्थापना दिनाचे औचित्य स्पष्ट केले. वाचन कट्टा स्थापन करण्यामागची भूमिका व विवेक वाहिनी मंडळाचे उद्दिष्ट विविध उदाहरणांद्वारे स्पष्ट केले.
मान्यवरांनद्वारे कवयत्री बहिणाबाई ग्राम वाचन कट्टा व विवेक वाहिनी मंडळाचे उद्घाटन प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आले.
प्रमुख वक्ते म्हणून प्रा. डॉ. पी. ए. अहिरे यांनी एन.एस.एस. स्थापना दिनाचे निमित्त साधून राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्व स्पष्ट केले. तसेच राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी महत्वाची भूमिका पार पडत असल्याचे म्हटले. त्यातून राष्ट्र निर्मितीचे भावी आधारस्तंभ घडत असतात. नाहाटा महाविद्यालय आणि युनिट या विद्यार्थ्यांच्या नीतिमूल्यांचा व सामाजिक नीतिमूल्यांची रुजवणूक करण्यासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडत असल्याचे म्हटले आहे.
वराडसिम गावाचे सरपंच सौ. प्रतिमा जंगले यांनी विद्यार्थ्यांना अभ्यास करण्याचा संदेश दिला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष उप प्राचार्य डॉ. ए. डी. गोस्वामी यांनी राष्ट्रीय सेवा योजना नाहाटा महाविद्यालय नेहमीच एक पाऊल पुढे असल्याचे म्हटले आहे. राष्ट्रीय सेवा योजनेच्या बॅचचे महत्व स्पष्ट करून स्वयंसेवकांची भूमिका स्पष्ट केली. कोठारी आयोगापासून नीतिमूल्यांची रुजवण करण्यासाठी 24 सप्टेंबर 1969 रोजी एन.एस.एस.ची स्थापना करण्यात आली हे स्पष्ट केले.
काही विद्यार्थ्यांनीही मनोगत व्यक्त केले. कुमार आदित्य हिवरे व कुमारी गायत्री बजाज यांनी आपले अंधश्रद्धा निर्मूलन व वाचन संस्कृती बाबत मनोगत व्यक्त केले. उन्नती व निकिता बोरसे ग्रुप यांनी वाचन संस्कृतीबाबत गीत सादर केले.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन महिला कार्यक्रमाधिकारी डॉ. ममता पाटील यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ. विलास महिरे यांनी सहकार्य केले.
कुमार रोहित पुलीवार व कुमारी संजना दोधानी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
कार्यक्रमांमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या विविध स्वयंसेवकांनी सहभाग घेतला. रासेयोचे विविध स्वयंसेवक उपस्थित होते. शुभम पाटील, विक्रांत रोडे, हर्षल चव्हाण, चेतना पाटील, सागर सोनवणे, सागर पाटील, वैभव पाटील, शुभम सोनार, आकाश बोदडे, खुशाल मानकर स्वप्नील डोळसे, आकाश सपकाळे, गायत्री बजाज, संजना दुधानी, कल्याणी पराळे यांसारखे विविध विद्यार्थी स्वयंसेवक उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सौ.एम. व्ही. वायकोळे, उपप्राचार्य डॉ.एस. व्ही. पाटील, उपप्राचार्य बी. एच. बऱ्हाटे, उपप्राचार्य ए. डी. गोस्वामी व डॉ. एन. इ. भंगाळे यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.



