भुसावळात जीर्ण इमारत कोसळली : जिवीतहानी टळली

भुसावळ : शहरातील श्रीराम मंदिर वॉर्डातील बडा हनुमान मंदिराच्या मागे एका जीर्ण इमारचा एक भाग कोसळल्याची घटना मंगळवारी रात्री आठ वाजता घडली. सुदैवाने या घटनेत प्राणहानी टळली. शहरातील जीर्ण इमारतींचा मुद्दा यामुळे पुन्हा ऐरणीवर आला आहे. मंगळवारी सकाळपासून शहरात दमदार पाऊस सुरू आहे.

शहरातील श्रीराम मंदिर वॉर्डातील अग्रवाल बंधूची मालकी असलेला जीर्ण वाडा या पावसामुळे कोसळला. सुदैवाने या ठिकाणी वाहतूक नव्हती तसेच पादचारी देखील नसल्याने जिवीत हानी टळली. इमारत कोसळल्यानंतर मोठा आवाज झाल्याने रहिवाशांनी घराबाहेर धाव घेतली.