मुंबई – मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ‘फिट इंडिया फ्रीडम रन’ आयोजित केले
सेंट्रल रेल्वे स्पोर्ट्स अकॅडमी (सीआरएसए) ने फिट इंडिया चळवळीच्या अनुषंगाने “७५वा स्वातंत्र्य दिन – आझादी का अमृत महोत्सव” च्यानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे “फिट इंडिया फ्रीडम रन 2.0” आयोजीत केली.
यावेळी अनिल कुमार लाहोटी, महाव्यवस्थापक, मध्य रेल्वे याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अध्यक्षस्थानी होते आणि श्रीमती मीनू लाहोटी, अध्यक्षा, मध्य रेल्वे महिला कल्याण संस्था (CRWWO) या उपस्थित होत्या.

दोन वेळा ऑलिम्पियन आणि एलिट धावपटू तसेच पद्मश्री पुरस्कार प्राप्त सुश्री सुधा सिंग ज्यांच्याकडे सलग पाच वेळा मुंबई मॅरेथॉन जिंकण्याचा अखंडीत विक्रम आहे त्यांना महाव्यवस्थापक, मध्य रेल्वे आणि अध्यक्षा, मध्य रेल्वे महिला कल्याण संघटन (सीआरडब्ल्यूडब्ल्यूओ) यांनी धावण्याच्या प्रारंभापूर्वी सन्मानित केले. श्रीमती मीनू लाहोटी, अध्यक्षा, सीआरडब्ल्यूडब्ल्यूओ यांनी निरोगीपणा आणि फिटनेसचा संदेश देण्यासाठी फुगे सोडले.


