मुंबई – मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक श्री अनिल कुमार लाहोटी यांनी दि. ४.९.२०२१ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे झालेल्या बैठकीत मध्य रेल्वेच्या मालवाहतूक कामगिरीचा आढावा घेतला. मध्य रेल्वेची मालवाहतूक कामगिरी केवळ दशलक्ष टनांच्या बाबतीतच नव्हे तर उत्पन्नाच्या बाबतीतही सर्वोत्तम आहे. आढावा बैठकीला श्री बी. के. दादाभोय, अतिरिक्त महाव्यवस्थापक; मणी जीत सिंह, प्रधान मुख्य वाणिज्यिक व्यवस्थापक; श्री मुकुल जैन, प्रधान मुख्य परीचालन व्यवस्थापक; मध्य रेल्वेच्या सर्व ५ विभागांचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक उपस्थित होते.

अनिल कुमार लाहोटी यांनी नवीन दृष्टीकोनासह ग्राहकांकडे जाण्यावर भर दिला. मध्य रेल्वेद्वारे मालवाहतूकीसाठी विद्यमान वस्तूंचा रेल्वेतील हिस्सा वाढविण्याचा तसेच नवीन वस्तूंची भर घालण्याकरीता सविस्तर चर्चा करण्यात आली.
कोविड लॉकडाउन आणि अनलॉक दरम्यान मध्य रेल्वेने २०१९-२० मध्ये ६२.४३ दशलक्ष टन मालवाहतूक केली आणि २०२०-२१ मध्ये ६२.०२ दशलक्ष टन मालवाहतूक केली. एप्रिल ते ऑगस्ट २०२१ दरम्यान मध्य रेल्वेने २९.४२ दशलक्ष टन लोड केले आहे जी गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील लोडिंगच्या तुलनेत ४१.७% अधिक आहे. मध्य रेल्वे आपल्या वाढीव उद्दिष्टापेक्षा १.७%ने अधिक आहे.
मध्य रेल्वेच्या “बिझनेस डेव्हलपमेंट अँड एक्विझिशन प्लॅन स्ट्रॅटेजी 2021” चे अनावरण महाव्यवस्थापकांनी केले. यावेळी ते म्हणाले की, मध्य रेल्वेने आपल्या अधिकारक्षेत्रात संपूर्ण कमोडिटी बास्केटचे मॅपिंग केले आहे. मध्य रेल्वे टीमने सर्वेक्षण करून, स्थानिक उत्पादने निवडून रेल्वे सह-कार्यक्षमता वाढवण्याची क्षमता विस्तृतपणे शोधली आहे आणि डोलोमाइट, फ्लाई ॲश, कॉटन बेल, कांद्याची निर्यात आणि ऑटोमोबाईल बांगलादेशला पाठविण्यासाठी विश्वसनीय आणि परवडणारी वाहतूक करण्यासाठी रेल्वेचा समावेश केला आहे. महाव्यवस्थापकांनी कृषी वस्तू, ऑटोमोबाईल, फ्लाय-ॲश आणि रसायनांच्या वाहतूकीसाठी रेल्वे वाटा सुधारण्याच्या गरजेवर भर दिला आहे कारण रेल्वे एक सुरक्षित, स्वस्त, जलद आणि विश्वासार्ह वाहतूकीचे माध्यम आहे. त्यांनी २०२१-२२ दरम्यान ६७.५ दशलक्ष टन लक्ष्याच्या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी मध्य रेल्वेच्या टिमला प्रोत्साहित केले. ऑटोमोबाईलची अतिरिक्त वाहतूक मिळवण्यासाठी वाहतूक (transit)वेळ कमी करणाऱ्या एनएमजी रेकचा हाय स्पीड प्रोटोटाइप विकसित केल्याबद्दल त्यांनी कौतुक केले. नाशवंत वस्तूंच्या हालचालींवर (movement) उच्च स्तरावरून परीक्षण केले जाते आणि ग्राहकांना वाहतूक (transit) वेळेचे आश्वासन दिले जाते.
रेल्वे ट्रेंड नुसार वाहतूक व्यवस्थेला अनुरूप करून विविध प्रोत्साहन देऊन ग्राहकांना मदत करत आहे. सोलापूर येथील डाळिंब, कांदा, भुसावळ येथून केळी आणि इतर नाशवंत, नागपूरहून संत्रा आणि इतर फळे आणि पुण्यातील साखर यासारख्या शेतकर्यांना किसान रेल्वेद्वारे फिलीप मिळाले आहे. तपशीलांमध्ये जात असताना, महाव्यवस्थापकांनी पुढे पारंपारिक वॅगन आणि व्हीपीयूंच्या अधिक किसान विशेष चालवून अधिक कृषी-वस्तू मिळवण्यावर भर दिला. २०२१-२२ दरम्यान मध्य रेल्वेने ३२४ किसान रेल चालवल्या आहेत. मध्य रेल्वेला चालू वर्षात पार्सल वाहतूकीतून रु. ११५ कोटी महसूल प्राप्त झाला आहे जो भारतीय रेल्वेच्या कोणत्याही झोनपेक्षा सर्वाधिक आहे.


