भुसावळ – भुसावळ शहर बाजारपेठ व तालुका पोलीस स्टेशन अंतर्गत सक्षम व सतर्क पोलीस पेट्रोलिंगसाठी तसेच गुन्ह्ये व गुन्हेगारीवर प्रतिबंध घालण्याच्या दृष्टीने शहरात विविध ठिकाणी आरएफआयडी डिव्हाइसेस मागील तीन दिवसात बसविण्यात आलेले आहे.
या प्रणालीचे उदघाटन आज १ रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंडे यांच्या हस्ते व अपर पोलीस उपअधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या उपस्थितीत झाले.
शहरातील वाढते गुन्हे व गुन्हेगारीवर पोलिसांची तिसरी नजर राहणार असून पोलिसांना शहरातील विविध भागात पेट्रोलिंग करतांना त्वरीत लोकेशन सह सविस्तर माहिती मिळण्याकरीता आरएफआयडी’ या प्रणालीचे जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मुंडे यांच्या हस्ते उद्घाटन आज बुधवार 1 रोजी येथील संतोषीमाता हॉल येथे करण्यात आले .
यावेळी व्यासपीठावर जळगाव अप्पर पोलिस अधिक्षक चंद्रकांत गवळी, प्रांताधिकारी रामसिंग सुलाने , मुख्याधिकारी संदिप चिद्रवार , शहर पोलिस ठाणे निरीक्षक इंगळे , तालुका पोलिस निरीक्षक , बाजारपेठ पोलिस निरिक्षक दिलीप भागवत उपस्थित होते .उपस्थित मान्यवरांचे स्वागत पुष्पगुच्छ देवून करण्यात आले .
प्रसंगी मान्यवरांचे उपस्थितीत बाजारपेठ व तालुका पोलिस कर्मचारी यांना आरएफआयडी कार्ड पोलिस अधिक्षक मुंडे यांचे हस्ते वितरित करण्यात आले .
यावेळी अप्पर पोलिस अधिक्षक चन्द्रकांत गवळी , प्रांताधिकारी सुलाने, मुख्याधिकारी चिद्रवार , व्यापारी संघटना अध्यक्ष अशोक नागराणी , सराफ असोसिएशनचे अध्यक्ष वसंत विसपुते , रोटरीचे संजय भटकर , भुसावळ महिला क्रीडा मंडळाच्या अध्यक्षा सौ. आरती चौधरीं , यांचेसह मान्यवरांनी मनोगत व्यक्त करीत या प्रणालीस शुभेच्छा दिल्या .
यावेळी उद्घाटनपर भाषणात एसपी श्री मुंडे म्हणाले की , यंत्रणेने आता पोलिसांची हजेरी समजणार असून, त्यात शहरातील पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांची माहिती सेव्ह करण्यात आली आहे.
या कार्यप्रणालीमुळे आता पोलिसांच्या कार्यक्षमतेत वाढ होणार असून एखाद्या घटनेचे वृत्त समजताच घटनास्थळी त्वरीत जाऊन दखल घेणे सुलभ व सोपे होणार आहे तसेच यामुळे कर्मचारी हजेरी समजणार असून, या मशीन(कार्ड ) मध्ये पोलिस कर्मचाऱ्यांची माहिती सेव्ह करण्यात आली आहे. शहरात बाजारपेठ , विविध ठिकाणी मशिन बसविण्यात आल्या आहेत. या प्रणालीमुळे पोलिस कर्मचाऱ्यांना डे नाइट गस्त बंधनकारक झाली आहे . जिल्ह्यात जळगाव शहरासह अमळनेर , भुसावळ शहरात ही प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. या मशिनमध्ये पोलिस कर्मचाऱ्यांच्या अंगठ्यांचा ठसा, नाव, बक्कल नंबर सेव्ह करण्यात आले असून, यावरून कर्मचाऱ्यांची गस्त घालताना नेमून दिलेल्या ठिकाणची हजेरी समजणार आहे.
जळगाव शहरात प्रथम ट्रायल बेसिसवर याचे प्रात्यक्षिक घेण्यात आले होते, त्यानंतर भुसावळ पोलिस स्टेशनलासुद्धा ही प्रणाली सुरू केली आहे. आरएफआयडी म्हणजे ‘रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेन्टीफिकेशन डिव्हाइस’ हे डिवाइस बोटांच्या ठशांवर कार्य करते. पोलिस कर्मचारी हे पेट्रोलिंग करत असताना ज्याठिकाणी जातील तेथे या डिव्हाइस सोबत बसवलेल्या कार्डवर मशिन धरून आपल्या बोटांचा ठसा देतील त्यानुसार त्यांची हजेरी व लोकेशन समजेल. भुसावळ शहरातील व्यापारी पेठ, सराफ बाजार , यासह विविध मंदिरे, मशिद, विविध पुतळे अशा ठिकाणी ही मशिन बसवण्यात आली आहे.
भुसावळात उपविभागीय पोलिस अधिक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठ पोलिस निरिक्षक दिलीप भागवत , शहरचे पी व्ही इंगळे ,तालुक्याचे विलास शेंडे , यांचे सहकार्याने ही यंत्रणा भुसावळात कार्यन्वित करण्यात आली असून यासाठी शहरातील विविध सामाजिक संस्था व शहर व्यापारी संघटना , सराफ असोसिएशन , प्रतिष्ठित नागरिक , यांचे मोलाचे सहकार्य लाभले . वरिष्ठांचे आदेश मिळताच आरएफआयडी ही
प्रणाली एक महिन्याच्या आत भुसावळ पोलिस ठाणे व तालुका पोलिस ठाणे अंतर्गत सुरु करण्यात आले असल्याची माहीती डीवाएसपी वाघचौरे यांनी प्रास्ताविक मनोगतात दिली .
यावेळी महिला पोलिस अधिकारी व कर्मचारी यांची मोफत आरोग्य तपासणी करून त्यांना औषधोपचार देवून सहकार्य करणाऱ्या आयोजक सौ आरती चौधरीं, यांचेसह टीमचा सत्कार डॉ मुंडे यांचे हस्ते करण्यात आला . तसेच पोलिस विभागाला सहकार्य करणाऱ्या शहरातील प्रतिष्ठित राधेश्याम लाहोटी , राजेश पारीख , अशोक नागराणी ,यांचेसह मान्यवरांचाही सत्कार करण्यात आला .
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा प्रशांत पाटिल यांनी तर पो नि दिलीप भागवत यांनी आभार व्यक्त केले.
यशस्वितेसाठी पो नि भागवत यांचे मार्गदर्शनाखाली सचिन पोळ , परदेशी, नाले , यांचेसह बाजारपेठ पोलिस कर्मचारी यांनी परिश्रम घेतले .



